कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अंबड

दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. बबन जनार्धन जिगे (43) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी घडली आहे.

बबन यांची १ हेक्टर ५० आर जमीन आहे. जमीन कसण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून अडीच लाखाचे कर्ज घेतले होते. पण जमीन नापिक असल्याने ते निराश झाले होते. मुलांचे शिक्षण व क२००९ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

बॅकेचे कर्ज घेऊन त्यांनी लोकांची उसनवार घेतलेले पैसे परत केले होते. पण यावर्षी शेतातील उत्पन्नही नाही. यामुळे ते निराश झाले होते. त्यातूनच ३१ ऑक्टोंबर रोजी बबन जिगे यांनी शेतातील राहत्या घरी विष घेतले. त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण विष तिथून त्यांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मठपिंपळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.