अंबाती रायडू अडचणीत, अंपायरने बॉलिंग अॅक्शनवर उपस्थित केले प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू अंबाती रायडू यांच्या बॉलिंगवर पंचांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंचांनी रायडूची बॉलिंग करण्याची अॅक्शन चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता येत्या 14 दिवसात त्याच्या बॉलिंगची चाचणी होणार असून त्याचा निकाल आल्यानंतरच रायडूच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

33 वर्षाचा पार्ट टाईम स्पिनर असलेल्या अंबाती रायडू याला हिंदुस्थान ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात खेळवण्यात आले होते. त्या सामन्यात रायडूने दोन ओव्हरसाठी बॉलिंग केली होती. मात्र त्यावेळी त्याने केलेली बॉलिंग चुकीच्या पद्धतीने केल्याचे पत्र पंचांनी हिंदुस्थानच्या टीम मॅनेजमेंटला पाठविले आहे. येत्या 14 दिवसात रायडूच्या बॉलिंगची चाचणी होणार आहे. मात्र त्या चाचणीचा निकाल येईपर्यंत रायडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार आहे.