रायुडूची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  सिडनी  

पहिल्या वन डे सामना गमावणार्‍या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. अंबाती रायुडूच्या गोलंदाजी शैलीवर सामनाधिकाऱयांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी संघव्यवस्थापनालाही कळवण्यात आले आहे. रायुडूची गोलंदाजीची शैली ही आयसीसीच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सामनाधिकाऱयांनी आपल्या अहवालात म्हटल्याचे कळतेय. यामुळे पुढील 14 दिवसांमध्ये रायुडूला आपल्या शैलीची चाचणी करून घ्यावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत रायुडू आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करू शकणार आहे. त्यामुळे रायुडूच्या चाचणीचा निकाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.