टोकियो ऑलिम्पिक या क्रीडा महोत्सवाची सांगता रविवारी झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग… स्थानिक जनतेचा विरोध… या पार्श्वभूमीवर जपानी सरकार, जपानी क्रीडा संघटना, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्यासमोर ऑलिम्पिक आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान उभे ठाकले होते. पण 23 जुलैपासून सुरू झालेला हा क्रीडा महोत्सव 8 ऑगस्टपर्यंत नॉनस्टॉप सुरू राहिला आणि कोणत्याही मोठय़ा अडथळ्याविना पारही पडला हे विशेष. अमेरिकेने 39 सुवर्ण, 41 रौप्य व 33 कास्य अशा एकूण 113 पदकांसह पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. चीनने (88 पदके) दुसरे तर यजमान जपानने (58 पदके) तिसरे स्थान पटकावले. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानने एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्य पदकांसह एकूण सात पदकांवर मोहोर उमटवली आणि 48वे स्थान पटकावले.
अमेरिका व्हॉलीबॉल महिला संघ, प्रत्येकी एक सुवर्ण तीन देशांना
टोकियो ऑलिम्पिक या प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवात प्रत्येकी एक सुवर्ण पदक तीन देशांनी पटकावले आहेत. बर्म्युडा, मोरोक्को व प्युर्टो रिको या तीन देशांना प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकता आले आहे. या तीन देशांना पदक तालिकेत 63वे स्थान देण्यात आले आहे.
बास्केटबॉल, व्हॉलीबॉलमुळे टॉपवर पोहोचले
अमेरिकने पदकतालिकेत पहिले स्थान टोकियो ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी पटकावले. बास्केटबॉलमध्ये अमेरिकेच्या महिला संघाने जपानवर 90-75 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच अमेरिकेच्या महिला संघाने व्हॉलीबॉलमध्ये ब्राझीलला 3-0 अशा फरकाने पराभूत करीत गोल्ड मेडल जिंकले. या दोन सुवर्ण पदकांमुळे अमेरिकेच्या सुवर्ण पदकांमध्ये वाढ झाली. चीनने 38 सुवर्ण पदके जिंकली असून अमेरिकने 39 सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे.
याचाच अर्थ अमेरिकेकडे फक्त एक सुवर्ण पदक जादा आहे. व्हॉलीबॉल व बास्केटबॉल या दोन खेळांतील सुवर्ण पदक अमेरिकेसाठी मौल्यवान ठरले असेच या वेळी म्हणावे लागेल.
टोकियो ऑलिम्पिक पदक तालिका
अव्वल दहा देश आणि हिंदुस्थान
देश सुवर्ण रौप्य कास्य एकूण
अमेरिका 39 41 33 113
चीन 38 32 18 88
जपान 27 14 17 58
ग्रेट ब्रिटन 22 21 22 65
रशिया 20 28 23 71
ऑस्ट्रेलिया 17 7 22 46
नेदरलॅण्ड 10 12 14 36
फ्रान्स 10 12 11 33
जर्मनी 10 11 16 37
इटली 10 10 20 40 (48)
हिंदुस्थान 1 2 4 7



























































