संशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर

कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर असल्याचे अमेरिकेतील ह्युस्टनच्या संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी कोरोनाच्या 5 हजारांहून अधिक जेनेटिक सिक्वेन्सवर केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष बुधकारी जाहीर केला. विषाणू म्युटेशनच्या (संरचनेत बदल) प्रक्रियेत सतत रूप बदलत आहे. यात किषाणू आणखी भयंकर संसर्गजन्य बनत आहे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. या निष्कर्षाने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.

– अमेरिकेत कोरोना विषाणूतील म्युटेशन सोंगटीप्रमाणे पसरत आहे. यात संसर्ग झालेले दररोज हजारो नवीन रुग्ण आढळत आहेत.
– कोरोनाच्या पहिल्या लाटेत विषाणूने ज्येष्ठांना ‘टार्गेट’ केले होते. दुसऱया लाटेत तरुण मंडळी व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्ग वाढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या