आमची इंटरनॅशनल कोंबडी, अजय- अतुलच्या गाण्याकर अमेरिकेतील व्यक्तीचा भन्नाट डान्स

जत्रा या मराठी चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणं फारच गाजलं. अजय-अतुलचं संगीत लाभलेले हे गाणी जितेंद्र जोशी याने लिहिले होते. कॉलेजमधील नृत्य असू दे किंवा लग्नाची वरात… हे गीत आवर्जून वाजवले जाते आणि त्यावर बेभान नृत्य केले जाते. कोंबडी पळाली या गाण्याची झिंग आजही कायम आहे, अगदी सातासमुद्रापार. एका अमेरिकन व्यक्तीने यावर भन्नाट डान्स केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

भरत जाधव आणि जितेंद्र जोशीसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना जितेंद्र जोशीने लिहिलंय, गाणं लिहिताना मी अजय-अतुलला म्हणालो होतो की, हे गाणे सुपरहिट होईल असं वाटतंय, पण इतकं दूरवर पोहोचल्याची कल्पना नव्हती. अर्थातच श्रेय अजय-अतुलचं.

या पोस्टवर कमेंट करताना भरत जाधवने लिहिलंय, संगीताला भाषेची मर्यादा नसते हेच खरे. हे गाणं अनेक देशांतील लोक अजूनही एन्जॉय करतात, याचा आनंद आहे. आमची इंटरनॅशनल कोंबडी.

आपली प्रतिक्रिया द्या