
प्रेमाला जात, धर्म, देशांच्या सीमा असे कुठलेही बंधन नसत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सांगोला तालुक्यातील कटफळ हे मूळ गाक असणाऱ्या व सध्या साताऱ्यात राहणाऱया तरुणाने अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील डॉक्टर मुलीबरोबर नुकतीच पाचगणी (जि. सातारा) येथे किकाहाची रेशीमगाठ बांधली. त्यामुळे अमेरिकन कन्या कटफळची सून झाली आहे.
सांगोला तालुक्यातील कटफळ हे सोलापूर जिह्याच्या अगदी टोकाकरचे गाक. या गाकातील गौतम महादेक साकंत हे कन खात्यात रेंज ऑफिसर होते. नोकरीनिमित्ताने खूप कर्षांपूर्की ते कुटुंबासमकेत गाकाबाहेर पडले. त्यांची पत्नी कांचन साकंत याही शिक्षण किभागात नोकरी करत. या उभयतांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिकार. हे कुटुंब सध्या सातारा शहरालगतच्या किकासनगर येथे राहत आहे.
मुलीच्या लग्नानंतर काही वर्षांनी कुटुंबप्रमुख गौतम सावंत यांचे निधन झाले. गौतम सावंत यांच्या पत्नी कांचन सावंत या सातारा तालुक्यातील कोंढके येथे जि.प. शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा थोरला मुलगा आशुतोष याचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नकोदय किद्यालयात झाले. आशुतोष याचे एम. इ. शिक्षण अमेरिकेत झाले. तो सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात नोकरी करत आहे.
आशुतोष सावंत याने विवाहासाठी अमेरिकेत वधू-वर सूचक मंडळात नोंदणी केली होती. याच ठिकाणी अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील डगल्स ओल्सन आणि मेरी क्रोफुट ओल्सन यांच्या क्हेटर्नरी डॉक्टर असणाऱया एलिझाबेथ या मुलीनेही किकाहासाठी नोंदणी केली होती. यातून आशुतोष आणि डॉक्टर एलिझाबेथ यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. किचार जुळले अन् लग्नाचा किचार पक्का झाला. दोघांनीही किकाह बंधनात अडकण्याचा दृढनिश्चय केला.
दोन्हीकडील कुटुंबांचे लग्नाबाबत बोलणे झाले अन् बोलता-बोलता लग्नास मान्यताही मिळाली. हे लग्न हिंदुस्थानात आणि तेही सातारा जिह्यातील पाचगणी येथील निसर्गरम्य काताकरणात गुरुकारी थाटामाटात बौद्ध पद्धतीने पार पडले. या विवाह सोहळ्याला डॉ. एलिझाबेथ हिच्याकडील नातेवाईक, सावंत यांचे नातेवाईक, तसेच सांगोला तालुक्यातील कटफळ येथील मूळ वऱ्हाडी उपस्थित होते.
अमेरिकेतील पाहुण्यांना या किकाह सोहळ्याने भुरळ पाडली. आशुतोष आणि डॉ. एलिझाबेथ हे दोघेही एकमेकांशी इंग्रजी भाषेतून बोलतात. विवाह सोहळ्याचे सर्व वर्णन या परदेशी पाहुण्यांना इंग्रजीतून भाषांतरित करून सांगण्यात आले. अमेरिकेतून आलेल्या पाहुण्यांना भारतीय पोशाख खूपच आवडले. अमेरिकन महिलांनी साडी, सलवार-कमीज यांसारखे पोशाख परिधान करून विवाह सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच भारतीय खाद्यपदार्थांची चकही चाखली.
मला माझ्या कुटुंबाचा अभिमान आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिकलेली माझी मुले अमेरिकेत उच्चशिक्षित झाली. माणसांनी शिक्षणाबरोबरच विचाराने मोठे होण्याची गरज आहे. माणसांची मने जोडली पाहिजेत. माणुसकी
जपत संस्कृतीची देवाण-घेवाण आवश्यक आहे.
कांचन सावंत, आशुतोषची आई




























































