अमित पागनीस यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

हिंदुस्थानातील दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई क्रिकेट संघाला या मोसमातील पहिल्याच सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सपाटून मार खावा लागला. साखळी फेरीतील पाचपैकी चार लढतींमध्ये मुंबईला हार सहन करावी लागली. या अपयशामुळे मुंबई संघाचे नवे प्रशिक्षक अमित पागनीस यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या