बिग बी यांना आंतरराष्ट्रीय ‘एफआयएएफ’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठत ‘एफआयएएफ’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ह’ पुरस्कार शुक्रवारी सायंकाळी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले हिंदुस्थानी ठरले आहेत. पुरस्कार सोहळ्याची काही छायाचित्रे बिग बी यांनी आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.

हे फोटो शेअर करताना बिग बी यांनी लिहिलंय, ‘मला 2021 एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने खूप आनंद होतोय. मला पुरस्कार दिल्याबद्दल एफआईएएफ, मार्टिन स्कॉर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन यांचे आभार. हिंदुस्थानातील चित्रपट वारसा वाचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आपले चित्रपट वाचविण्यासाठी देशव्यापी चळवळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत राहील.’