
अमिताभ बच्चन लवकरच ‘उंचाई’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजश्री प्रॉडक्शनने त्यांना सरप्राईज दिले आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते ‘उंचाई’मधील बिग बी यांच्या कॅरेक्टरचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटात मैत्री हा धागा असल्यानेच ‘शोले’तील वीरूने ‘उंचाई’मधला जयचा लूक जगासमोर सादर केला आहे. अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अमिताभ-रेखा यांच्या डय़ुएट गाण्यांची पर्वणी
बॉलीवूडचे शहेनशहा, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि सौंदर्यसम्राज्ञी अभिनेत्री रेखा यांचे अनेक चित्रपट गाजले. 10 ऑक्टोबर हा रेखा यांचा तर 11 ऑक्टोबरला अमिताभ यांचा वाढदिवस. दोघांचेही चाहते हे दोन्ही दिवस आपापल्यापरीने साजरे करतात. मंगळवारी विलेपार्ले पूर्व येथील ‘सुरताल कराओके क्लब’ने अनोखे सेलिब्रेशन आयोजित केले आहे. यामध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या डय़ुएट गाण्यांचे बहारदार सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम इ-स्क्वेर कॉम्प्लेक्स, पाचवा मजला, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व येथे पार पडेल. कार्यक्रम विनामूल्य आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संपर्क महेश कालेकर 9769348413.
























































