घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे आवळा सरबत

एकीकडे कोरोना विषाणू थैमान घालत आहे, तर दुसरीकडे कडक उन्हाळाही सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्या अनेक तक्रारी सुरू होतात. या दिवसात अनेक आजार डोके वर काढत असल्याने प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. या दिवसामध्ये थंडगार सरबत पिणे कधीही चांगले. आज आपण घरच्या घरी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि तहानही भागवणारे आवळा सरबत बनवणार आहोत.

साहित्य –

आवळा, गुळ, मिठ, आलं, लिंबू आणि इनो किंवा फ्रूट साल्ट

कृती –

– प्रथमत: आवळा घ्या
– आवळ्यातील बी काढून टाका
– बी काढल्यानंतर आवळा ठेचून घ्या आणि त्यातील रस काढा
– मिक्सरमध्ये आवळा रस, आलं, मिठ, गुळ आणि अर्ध्या लिंबाचा रस असे सर्व एकत्र करून घ्या
– त्यानंतर गाळणीने ग्लासमध्ये गाळून घ्या
– सर्व्ह करताना ग्लासमध्ये इनो किंवा फ्रूट साल्ट टाका (यामुळे त्यावर छान फेस येतो)

आपली प्रतिक्रिया द्या