अमरावती जिल्ह्यातील युवासेना युवती पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विधानसभा युवती अधिकारी – अंजली वानखडे (अमरावती विधानसभा), उपशहर युवती अधिकारी – असमा परवीन शेख (अमरावती शहर), नरसीन परवीन मोहम्मद (अमरावती शहर), विधानसभा युवती अधिकारी – प्रांजली कुलट (दर्यापूर विधानसभा), तालुका युवती अधिकारी – स्वाती झोड (अंजनगाव सुर्जी तालुका), उपतालुका युवती अधिकारी – श्रेयसी तुरखडे (अंजनगाव सुर्जी तालुका), विधानसभा युवती अधिकारी – स्नेहल ठेंगरे (बडनेरा विधानसभा), उपशहर युवती अधिकारी – मुक्ता ढेरे (बडनेरा शहर), आकांक्षा खडसे (बडनेरा शहर), तालुका युवती अधिकारी – कांचन मानकर (वरुड तालुका), उपतालुका युवती अधिकारी – त्रिवेणी परती (वरुड तालुका), तालुका युवती अधिकारी – अलका पारडे (भातकुली तालुका), उपतालुका युवती अधिकारी – कल्पना मुळे (भातकुली तालुका).