
अजित पवार गटाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी गटातील सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परांजपे यांनी सुनेत्रा पवारांना पत्र लिहित राजीनामा दिला आहे. आनंद परांजपे यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
आनंद परांजपे यांनी पत्रात नमूद केले आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक – ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे. तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. परांजपे यांनी या पत्राची प्रत खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांनाही पाठवली आहे.




























































