कोरड्या नदीत सापडल्या नंदीच्या जुन्या मुर्ती

सामना ऑनलाईन । म्हैसूर

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात एका कोरड्या नदीत नंदीच्या दोन पुरातन मुर्ती आढळल्या आहेत. जेव्हा या मुर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा या मुर्ती पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.

म्हैसूर पासून 20 किमी दूर अरसिनाकेरे गावात काही वृद्धांनी या नदीत नंदी बैलाच्या मुर्ती असल्याचे सांगितले. तसेच जेव्हा पाणी पातळी जेव्हा घटते तेव्हा या मुर्तीचा वरील भाग दिसतो असेही त्यांनी सांगितले होते. यावेळी ही नदी कोरडी झाली होती. तेव्हा ग्रामस्थांनी ठरवून खोदकाम सुरू केले. तेव्हा वृद्धांनी सांगितलेली गोष्ट खरी ठरली. कोरड्या नदीमध्ये नंदीच्या दोन मुर्त्या आढळल्या. त्या बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जेसीबीचाही वापर केला.

या घटनेची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या मुर्त्या 16-17 व्या शतकातील असतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या