आंध्रात एका दिवसात 13 लाख जणांना लस टोचली

कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आता आंध्र प्रदेशने नवा विक्रम रचला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत राबवलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत 13 लाख जणांना लस टोचण्यात आली. ही मोहीम रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. विशाखपट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर या जिल्ह्यांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त जणांचे लसीकरण झाले. केंद्र सरकारने आम्हाला लसींचा पुरेसा लससाठा पुरवला तर दरदिवशी 10 लाख जणांचे लसीकरण करू शकतो, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या