
आंध्र प्रदेशमध्ये केमिकल कंपनीचा बॉयलर फुटल्याने झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेशच्या एलुरू जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
एलुरूचे पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30च्या दरम्यान एलुरू येथील अक्किरेड्डीगुडेम येथे पोरस लॅब कंपनीत घडली. या कंपनीत औषधांमध्ये उपयोगी येणाऱ्या रसायनांची निर्मिती केली जाते. बुधवारी देखील ही प्रक्रिया सुरू होती. त्याच दरम्यान बॉयलरमध्ये काही बिघाड होऊन अॅसिड लीक झालं.
Andhra Pradesh | Six killed & 12 injured in a fire accident at a chemical factory in Akkireddigudem, Eluru, last night. The fire broke out due to leakage of nitric acid, monomethyl: Eluru SP Rahul Dev Sharma
(Visuals from last night) pic.twitter.com/sRwkTRrLQs
— ANI (@ANI) April 14, 2022
यानंतर जोरदार आवाज होऊन बॉयलर फुटला आणि आग लागली. त्यावेळी कारखान्यात रात्रपाळीचे कर्मचारी होते, ते या आगीच्या तडाख्यात सापडले. या भीषण दुर्घटनेत 6 जण मृत्युमुखी पडले असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना रुपये पाच लाख प्रत्येकी इतकी मदत घोषित झाली आहे.


























































