आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना दिलासा, चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी सशर्त जामीन मंजूर केला आहे. 24 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशमधील कौशल्य विकास महामंडळात झालेल्या घोटाळ्यात त्यांना अटक झाली असून ते 50 दिवस न्यायालयीन कोठडीत होते.

आंध्र प्रदेशमधील कौशल्य विकास महामंडळात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी चंद्रबाबू नाय़डू यांना अटक करण्यात आली.  30 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली, त्यानंतर न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणांमुळे चार आठवड्यांसाठी अंतरिम जामिन मंजुर करण्यात आला आहे. ही माहिती उच्च न्यायालयाचे वकिल सुनकारा कृष्णमूर्ती यांनी दिली असून सध्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत येणं बाकी आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रबाबू नायडू यांना 24 नोव्हेंबरपर्यंक सशर्त जामिन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने 24 नोव्हेंबरला न्यायालयात सरेंडप करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या अटीनुसार चंद्रबाबू नायडू रुग्णालया व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमात उपस्थिती लावू शकत नाही. याचबरोबर ते कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचा हिस्सा होऊ शकत नाही त्याचबरोबर ते कोणाशीही फोनवर बोलू शकत नाही.

कोट्यावधी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी चंद्रबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. ते 50 दिवसांहून अधिक दिवस राजमुंदरी तुरुंगात आहेत. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी सीआयडीने अटक केली होती. याआधी तिने विजयवाडा न्यायालयात दरवाजा ठोठावला होता, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशा आसली