>> अनघा सावंत
`अनुराधा राजाध्यक्ष’ यांनी यू टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून या कार्याला सुरुवात केली. गेली चार वर्षे त्या अनोळखी मुले आणि त्यांचे पालक यांच्याशी खेळीमेळीने संवाद साधत `मनाचे श्लोक’ या विषयावर व्हिडीओ करतात. आजच्या पिढीलाच नव्हे तर सर्वांनाच मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगणारे, त्यांना जगण्याशी खऱया अर्थाने जोडून उदाहरणासहित समजावून सांगणारे हे व्हिडीओ असून या उपामाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी रचलेली सहजसुंदर काव्यरचना म्हणजे `मनाचे श्लोक.’ हे श्लोक ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. मनाचे श्लोक म्हणजे स्वतच्याच मनाशी सकारात्मक संवाद. हा अनमोल ठेवा आपल्या पुढील पिढीनेही जपावा म्हणून आपण नेहमीच मुलांना प्रेरित करतो. मात्र हे जरी खरं असलं तरी मनाच्या श्लोकांचे संस्कार करतानाच त्यांचा खरा अर्थ समजून घेऊन तो प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी प्रेरित करणं, हे चित्र मात्र दुर्मीळच दिसतं. याचीच जाणीव होऊन `मनाचे श्लोक’ हा स्तुत्य उपामानिशी प्रसार करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री आणि लेखिका अनुराधा राजाध्यक्ष यांचं कार्य खूप मोलाचं आहे.
याविषयी अनुराधा ताई म्हणाल्या, “कोविड काळात मुलांच्या हातात ऑनलाइन अभ्यासाच्या निमित्ताने मोबाइल आले. इंटरनेट आलं आणि इंटरनेटवर तर चांगल्या-वाईट अनंत गोष्टी असतात. मुलांना `मोबाइल टाइम अप’ असं म्हणणारे पालक आपल्याला दिसतात. पण ते स्वतचा `मोबाइल टाइम अप’ असं कधी करताना दिसत नाहीत. तसंच सगळ्यांच्या देखत पालकांना मुलांवर अधिकार गाजवायलाही आवडतो. पण स्वतच्या वागण्यातून पालक मुलांवर संस्कार करू शकतात. `ािढयेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असं रामदास स्वामी जे म्हणतात ते पालकांना समजलं तर मुलांवर निश्चितच उत्तम संस्कार होतील, हे जाणवून मी मुलांशी आणि पालकांशी संवाद साधत, त्यांच्या घरातल्या घटनांचा आधार घेत त्यांना एकेका श्लोकाचा अर्थ समजवायला सुरुवात केली. `मनाचे श्लोक’ आपल्याच मनाला आपणच कसं वागायचं याची शिकवण देतात. संकटावर मात करण्याचं सामर्थ्य वाढवतात म्हणून कोविडमध्ये मनाच्या श्लोकावर कार्य सुरू केलं, जे आजही सुरू आहे.”
अनुराधा ताईंनी `अनुराधा राजाध्यक्ष’ या यू टय़ुब चॅनेलच्या माध्यमातून या कार्याला सुरुवात केली. गेली चार वर्षे त्या अनोळखी मुले आणि त्यांचे पालक यांच्याशी खेळीमेळीने संवाद साधत `मनाचे श्लोक’ या विषयावर व्हिडीओ करतात. यात विशेष मुलांसह, दिव्यांग मुलांचेही व्हिडीओ आहेत. शिवाय कॅनडा, दुबई, लंडन इथूनदेखील मुले आणि पालक व्हिडीओमध्ये सामील झालेली आहेत. आजच्या पिढीलाच नव्हे तर सर्वांनाच मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगणारे, त्यांना मानवी जगण्याशी खऱया अर्थाने जोडून उदाहरणासाहित समजावून सांगणारे हे व्हिडीओ असून सध्या या उपामाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचंच एक उदाहरण देताना त्या म्हणतात,
प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।।
याचा सर्वसाधारण अर्थ असा होतो की, सकाळी उठल्यावर रामनाम घ्यावं. मुळात हा `राम’ शब्द म्हणजे काय आहे? याचा अर्थ प्रभाते मनी मी `राम राम’ म्हणत बसावं का? … की माझ्या आयुष्यातील `राम’ मला शोधायचा आहे? तर `प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ याचा खरा अर्थ म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रथम तुमच्या कामाचं नियोजन करा. तुमच्या आयुष्यातल्या या `रामा’वर लक्ष केंद्रित करा. सकाळी उठल्यावर अभ्यासाला बसणं हा विद्यार्थ्यांचा राम, माझ्या आयुष्यात चांगलं ध्येय ठेवून उत्तम काम करणं म्हणजे माझा राम. कर्मातला राम शोधता आला तर तो आपोआप विचारात, वागण्यात, वृत्तीत येतो.
सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच अनुराधा ताईंनी `मनाच्या श्लोकां’वर आधारित राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. स्पर्धेचं हे दुसरं वर्ष असून ही स्पर्धा संपूर्ण
ऑगस्ट महिना चालणार आहे. ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे घरात बसूनच व्हिडीओ बनवायचा आहे. यात 6 ते 10 वर्षं, 11 ते 15 वर्षं आणि 16 वर्षं वरील असे वयोगट आहेत. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, कर्नाटक एवढंच काय सौदी अरेबियातूनही स्पर्धक आले आहेत, हे या उपामाचे घवघवीत यशच म्हणावं लागेल. अनुराधा यांचे मनाचे श्लोकांचे पाच मिनिटांचे व्हिडीओ विचारांनी समृद्ध व संस्कार करणारे आहेत. `यू टय़ुब’वर अनुराधा राजाध्यक्ष याच नावाने सर्च केल्यास ते बघता येतात. प्रवेश विनामूल्य असून ही स्पर्धा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांसाठी आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी संपर्क : aहल्radप्araर्प्ब्aक्sप्a@gस्aग्त्.म्दस्
`मनाच्या श्लोकांतून तुम्हाला काय मिळालं, काय आवडलं आणि काय पटलं, ते श्लोकांशी कसं सुसंगत आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि तसंच उदाहरण तुमच्या आयुष्यातही तुम्हाला दिसलंय का? हे तुम्हाला जर सांगता आलं तर तुम्हाला जगण्यातला राम मिळाला असं म्हणता येईल,’ असे अनुराधा ताई म्हणाल्या.
मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा अनेक ठिकाणी घेतल्या जातात. पण मनाच्या श्लोकांची मानवी जगण्याशी सांगड घालत केवळ सकारात्मक दृष्टिकोनच देणारी ही स्पर्धा आगळीवेगळी असून, मुलांच्या आणि सर्वांच्याच जडणघडणीत बहुमोल कार्य करणारी आहे. मला चांगलंच वागायचं आहे, हे समजण्यासाठी खूप मोठी शक्ती लागते. ही शक्ती कुठलाही धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन उत्तम वागायला शिकवते. ही शक्ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ही स्पर्धा आहे, अशी भावना अनुराधा ताईंनी व्यक्त केली.