
सामना प्रतिनिधी । अलिबाग
चिंतामणराव केळकर विद्यालयाचा इयत्ता 9 वीचा विद्यार्थी अनिकेत तेरेदेसाई याने युनायटेड इंटरनेशन इंग्लिश ऑलिंपियाड 2018 मध्ये संपूर्ण देशात 32 वा क्रमांक मिळवला.
देशातील सर्व बोर्डांच्या शाळांचे लाखो विद्यार्थी युनायटेड इंटरनेशन इंग्लिश ऑलिंम्पीयाड या परिक्षेसाठी बसतात. त्यातून 100 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची राष्ट्रीयस्तरावर परीक्षा घेतली जाते.
युनायटेड इंटरनेशन इंग्लिश ऑलिंम्पीयाड 2018 च्या राष्ट्रीयस्तरावरील परिक्षेसाठी देशातून ज्या100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात अनिकेत तेरेदेसाई याचा समावेश आहे. वोक्याबीलरी अॅण्ड फंक्शनल ग्रामर, रिडींग काँप्रीहेन्सीव अॅण्ड इंटरेक्टीव इंग्लिश या विषयांची परीक्षा घेतली जाते. अनिकेतने या परिक्षेत 50 पैकी 46 गुण मिळवून पूर्ण देशात 32 वा क्रमांक मिळवला. अनिकेतने याआधी शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यातून पहिला येण्याचे यश मिळवले होते. ट्रस्ट व शाळेतर्फे त्याचे अभिनंदन करण्यात आले.

































































