मराठी माणसासाठी अखंडपणे कार्य करत राहू – अनिल देसाई

लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी यावेळी प्रास्ताविक करताना महासंघाच्या इतिहासाचा आढावा घेतला. 1973 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महासंघाला आज 50 वर्षे पूर्ण झाली. जिथे नोकरीला असणारी माणसे नोकरी नसलेल्या माणसांसाठी लढतात अशी जगाच्या पाठीवरची ही एकमेव चळवळ आहे, असे देसाई म्हणाले. महासंघाचे पहिले अध्यक्ष, दिवंगत शिवसेना नेते सुधीर जोशी यांचेही योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केले. मराठी माणसाला नोकऱया मिळवून देण्यासाठी महासंघ सातत्याने कार्य करत असून यापुढेही अखंडपणे करत राहील. चळवळीचे कार्य करून शिवसेनेला बळ देत असतानाच विधान भवनावर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी महासंघाचा प्रत्येक कार्यकर्ता जिवाचे रान करेल, अशी ग्वाहीही अनिल देसाई यांनी यावेळी दिली.