डेब्यू सामना, शून्य धावा, हॅटट्रीक अन् 6 विकेट्स, आशियाई खेळाडूचा विश्वविक्रम

601

नेपाळच्या पोखरा येथे सुरू असलेल्या 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळच्या एका महिला क्रिकेट खेळाडूने एका विश्वविक्रमाची नोंद केली. नेपाळची महिला खेळाडू अंजली चंद हिने आपल्या पदार्पणाच्या लढतीत हॅटट्रीकसह सहा विकेट घेत विश्वविक्रमाची नोंद केली.

13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळ आणि मालदीवच्या महिला संघाचा सामना रंगला. अंजली चंद हिचा हा पदार्पणाचा सामना होता. पदार्पणाच्या लढतीतच अंजलीने 2.1 षटकांची गोलंदाजी करत सहा फलंदाजांना बाद केले. यातील तीन खेळाडूंना सलगच्या चेंडूवर बाद करत तिने हॅटट्रीकची देखील नोंद केली. या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अंजलीने यासाठी एकही धाव खर्च केली नाही. शून्य धावा देत 6 बळी मिळवण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा विक्रमही आता अंजलीच्या नावावर जमा झाला आहे. अंजलीने मलेशियाची मास एलिसा या गोलंदाजा विक्रम मोडला. एलिसाने 3 धावा देत 6 बळी घेतले होते.

chand

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचा तरुण गोलंदाज दीपक चहर याने नुकतीच सर्वश्रेष्ठ कामगिरीची नोंद केली होती. त्याने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 लढतीत 7 धावा देत 6 बळी मिळवले होते आणि यात देखील त्याच्या हॅटट्रीकचा समावेश होता.

dipak-chahar

आपली प्रतिक्रिया द्या