सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी आणखी एक गँगस्टर ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या  हत्येचा तपास करणाऱया पोलिसांनी आणखी एका गँगस्टरला ताब्यात घेतले आहे. सराज सिंह उर्फ मिंटू याला अमृतसरमधील तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.सिद्धू मुसेवाला याची रविवारी, 29 मे रोजी मानसा जिह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

सिद्धूच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्या झाडल्याच्या जखमा होत्या. त्याचे हत्याकांड गँगवॉरमधून झाल्याचा संशय आहे. त्याच दिशेने पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. या तपासांतर्गत कुख्यात गँगस्टर सराज सिंगला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, ड्रग्स तस्करी, शस्त्र बाळगणे आदी दीड डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात वापरलेली वाहने सराज सिंगच्या सांगण्यावरून पुरवण्यात आली होती, असा आरोप आहे.