अनुष्काने पोस्ट केला विराटसोबतचा ‘तो’ खास फोटो, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-anushka

बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वात फेव्हरेट असलेली जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. ‘विरुष्का’ची प्रेम कहाणी साऱ्यांच्याच चर्चेचा विषय होती. लग्नानंतरही चाहते त्यांच्या विषयी चर्चा करत असतात. अनुष्का आणि विराट हे दोघेही एकमेकांविषयी खास, रोमँटिक पोस्ट शेअर करतात. त्या चांगल्याच व्हायरल होत असतात. अनुष्काने विराटच्या वाढदिवसानिमित्त क्यूट फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने विराटसाठी एक खास पोस्ट लिहिली

अनुष्काने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये दोघेही समुद्र किनारी एकमेकांच्या गळ्यातगळे घातलेले दिसतात. यासोबत तिने लिहिले आहे की, ‘या फोटोसाठी आणि ज्या तऱ्हेने तू जीवन जगतो त्यासाठी कोणत्याही फिल्टरची गरज नाही. तू प्रामाणिक आणि शूर आहे. शौर्य चिंता मिटवते. कठीण काळातून स्वत:ला बाहेर काढण्यात तुझ्यासारखा वीर मी कुणी पाहिला नाही.’

तू वेगानं पुढे जात आहेस कारण तू एखादी गोष्ट कायम स्वत:मध्ये ठेवत नाही आणि निर्भय आहेस. मला माहित आहे की आपण सोशल मीडियावर अशाच गप्पा करणारे लोक नाही. पण काही वेळेस मला असं वाटतं की, मला जगाला ओरडून सांगावसं वाटतं की तू किती चांगला माणूस आहेस.’

‘ते लोक अधिक सौभाग्यशाली आहेत जे तुला ओळखतात. प्रत्येक गोष्ट आणखी प्रकाशमान आणि सुंदर बनवल्याबद्दल आभार. आणि हॅपी बर्थडे क्यूटनेस’, असंही तिनं म्हटलं आहे.

विराटनंही दिलं उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

‘तू माझी ताकद आहे. तू मला योग्य रस्ता दाखवणारी शक्ती आहेस. प्रिये आपल्या दोघांना जवळ आणणाऱ्या देवाचे मी रोज आभार मानतो. आय लव्ह यू.’

विराट आणि अनुष्का हे सहा वर्ष डेट करत होते. 2017 मध्ये ते विवाहबद्ध झाले. लग्नासाठी त्यांनी निवडक लोकांनाच आमंत्रण दिले होते. जानेवारी 2021 मध्ये त्यांना मुलगी झाली. तिचे नाव वामिका ठेवण्यात आले.