
जगप्रसिद्ध टेक कंपनी ऍपलने आपल्या युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम आयओएस26 वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये लाँच केली आहे. या वेळी ऍपलचे सीईओ टिम कुक उपस्थित होते. या वेळी कंपनीने ऍपलने कॉल स्क्रीनिंग फीचर लाँच केले. नवीन डिझाइनसह आयओएसचे नावदेखील बदलण्यात आले आहे. आयओएस 17 नंतर, आयओएस 18 येणार होते, परंतु कंपनीने थेट 26 आणले. त्यामुळे आता सर्व ऍपल उत्पादनांसाठी आयओएस नवीन नावाने उपलब्ध असेल.