व्हॅलेंटाईन डे, आयफोनवर बंपर डिस्काऊंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॅलेंटाइन डेनिमित्त अॅपलने आपल्या ग्राहकांसाठी खास सेल आणला आहे. या सेलमध्ये आयफोन 17 सीरिज, मॅकबुक, आयपॅड, अॅपल वॉच आणि एअर पॉड्स यांसारख्या प्रोडक्टस्वर बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये कॅशबॅकचाही समावेश आहे. अॅपल कंपनी थेट प्रोडक्टस्वर सूट देत नाही, परंतु बँक कार्डद्वारे पेमेंटवर 10 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो मॅक्सवर आयसीआयसीआय, ऑक्सिस बँक आणि अमेरिकन एक्स्प्रेसच्या कार्डस्वर 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. आयफोन एअर, आयफोन प्रो आणि प्रो मॅक्सवर 5 हजार रुपये कॅशबॅक दिला जात आहे.