
शालेय शिक्षण विभागाच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येतो. वर्ष 2022-23 च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार असून नाव नोंदणी 25 मे सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. इच्छुक शिक्षकांनी https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकला भेट द्यावी, असे आवाहन करण्यता आले आहे. ही लिंक पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱया राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी 15 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या मुदतीपर्यंत शिक्षकांनी पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी केले आहे.




























































