
ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. त्याच दिवशी रहमान यांच्या टीममधील गिटारिस्ट मोहिनी डे यांनीही घटस्फोट घेतला. त्यामुळे रहमान आणि मोहिनी यांच्यात अफेअर आहे का, अशी चर्चा रंगली. अखेर या चर्चांवर ए. आर. रहमान यांच्या वकिलाने स्पष्टीकरण दिले आहे. या दोन्ही घटस्फोटाचा एकमेकांशी संबंध नाही. सायरा आणि रहमान यांनी वेगळे होण्याचा निर्णय स्वतः घेतला. या दोघांमध्ये तणावातून घटस्फोट झाला आहे. असे वकिलाने सांगितले.
























































