निमित्त: स्त्री शक्तीतून साकारली वास्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील आर्थिक, सामाजिक व राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेल्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचा शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा येत्या 23 ते 25 डिसेंबर या काळात दादर (पश्चिम) येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सभागृहात साजरा होत आहे. आधुनिकतेची कास धरून पुढे जाणाऱया या समाजाने महिला सबलीकरणाचे तत्त्व फार पूर्वीपासून अवलंबवले आहे.

मुंबईतील आर्थिक, सामाजिक व राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेल्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचा शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा येत्या 23 ते 25 डिसेंबर या काळात दादर (पश्चिम) येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सभागृहात साजरा होत आहे. कोणतीही संस्था मोठी झाली तरी त्यामागे असंख्य लोकांचे आर्थिक व सामाजिक बळ असते. या समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह संपूर्ण मुंबईतले आज अग्रगण्य सभागृह आहे. या सभागृहाच्या उभारणीच्या मागे समाजबांधवांचे मोठे परिश्रम आहेत. सभागृहाच्या पायाची प्रत्येक वीट समाज बांधवांच्या आर्थिक सहाय्यातून उभी राहिली आहे.
या समाजाच्या नावाला व सभागृहाच्या उभारणीला मोठा इतिहास आहे. 12 ऑक्टोबर 1958 रोजीच्या ज्ञातीच्या भरसभेत संस्थेचे नाव ‘सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज’ असावे असा ठराव हरिश्चंद्र महादेव चुरी यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर झाला आणि आज 75 वर्षांनंतरही संस्थेचे हेच नाव कायम आहे. ज्ञातीच्या 2 ऑक्टोबर 1958 च्या भरसभेत सूर्यवंशी समाजाचे सभागृहाची इमारत बांधण्याचे ठरले. अंदाजे 1 लाख 10 हजार रुपयांचे अंदाजपत्रक अपेक्षित धरले होते. त्या काळात निधी उभा करणे कठीण काम होते, पण तेव्हा समाजबांधवांनी 32 हजार रुपये देणगी उभी केली. यामध्ये समाजाच्या महिलांचाही मोठा हातभार लागला. दिवंगत आमदार शरयू ठाकूर व त्यांच्या महिला सहकाऱयांनी तसेच कलोत्तेजक मंडळाने खास नाटकाचा शो लावला. तिकीट विक्रीतून निधी राहिला. स्त्र्ााr शक्तीमुळे संस्थेचे सभागृह उभे राहाण्यात मोठा हातभार लागला. पुढे 3 मे 1965 रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहाची कोनशिला बसवली. पुढे काळानुसार संस्था मोठी होत गेली आणि संस्थेच्या सभागृहाचाही आकार वाढत गेला. आता सामाजिक बांधिलकी ठेवून संस्था मार्गक्रमण करीत आहे.
आधुनिकतेची कास धरून पुढे जाणाऱया या समाजाने महिला सबलीकरणाचे तत्त्व फार पूर्वीपासून अवलंबवले आहे. हुंडा पद्धती संपूर्णतः वर्ज्य आहे. इतकेचे नव्हे तर लग्न समारंभाचा खर्चही नवरा-नवरीकडील दोन्ही पक्ष विभागून करतात. ‘शिक्षण हाच प्रगतीचा मूलमंत्र’ आहे जे जाणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्राधान्याने उपक्रम राबवले जातात. त्याशिवाय समाजबांधवांसाठी वैद्यकीय शिबीर, रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाते. कोविडच्या काळात धान्य, औषधांचे वाटप, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले होते. त्याशिवाय निराधार व गरजू महिलांना अनुदान दिले जाते. नव्या पिढीला करीअर मार्गदर्शन शिबीर केवळ समाजापुरते मर्यादित न ठेवता सर्वच मुंबईकरांसाठी खुले असते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून पूरग्रस्तांना, भूकंपग्रस्तांना मदतीचा हात संस्थेने वेळोवेळी दिला आहे.