क्षुल्लक कारणावरुन झाला वाद, सिगारेट विक्रेत्याला 100 मीटर फरफटत नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

870 रुपयांच्या वादातून सिगारेट विकणाऱ्याला कार चालकाने 100 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला ताब्यात घेतले आहे. विव्रेत्याला फरफटत नेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

तक्रारदार हे सिगारेट विक्रीचे काम करतात. मंगळवारी पहाटे ते ओशिवरा येथील न्यू लिंक रोड येथे पायी चालत सिगारेट विक्रीचे काम करत होते. पहाटेच्या सुमारास एक पांढऱया रंगाची गाडी आली. त्या गाडीमधून चार जण हे तक्रारदार यांच्याकडे आले. त्याने 870 रुपयांच्या सिगारेट विकत घेतल्या. तेव्हा तक्रारदार यांनी सिगारेटचे पैसे मागितले. त्या चौघांनी पैसे देण्यास नकार दिला.

त्या चौघांनी तक्रारदार यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एका महिलेने तक्रारदार यांच्या कॉलरला पकडले. मागील सीटवर बसलेल्याने हात बाहेर काढून तक्रारदार यांना मारहाण केली. तसेच गाडी बेदरकरपणे चालवले. चालकाने तक्रारदार यांना 100 मीटर फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घडल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला ताब्यात घेतले.