मलायका आणि अर्जुन कपूरच्या अफेयरच्या चर्चांना पुन्हा उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या अफेयरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या दोघांनी नुकतीच लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. त्यावेळी हे दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पुन्हा एकदा त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत.

अर्जुन-सलमानमध्ये सुरूच आहे कोल्ड वॉर, पाहा व्हिडिओ…

मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी शनिवारी अर्जुनच्या बहिणी खुशी व जान्हवी कपूर सोबत लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली. यावेळी अर्जुन व मलायका एकमेकांसोबत खूप खूश दिसत होते. मलायकाने तिचा नवरा अरबाज खानला घटस्फोट देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अरबाज व मलाईकाच्या घटस्फोटास अर्जुनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अर्जुनने याआधी मलायकाची नणंद अर्पिता खानला देखील डेट केले आहे.

बहिणीच्या कपड्याच्या बातमीवर भडकला अर्जुन कपूर, शिव्यांची वाहिली लाखोली

summary : Arjun Kapoor and Malaika Arora snapped together at LFW 2018