अर्जुन-सलमानमध्ये सुरूच आहे कोल्ड वॉर, पाहा व्हिडिओ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यात सुरू असलेले कोल्ड वॉर जगजाहीर आहेच. पण काळाबरोबर त्यांच्यातील कटुताही कमी झाली असेल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र एकेकाळी चांगले मित्र असलेले अर्जुन-सलमान आजही एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीच्या व्हिडिओतून त्यांच्यातील कटुता पुन्हा एकदा समोर आली आहे.

सोनमच्या रिसेप्शनचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सलमान व जॅकलीन फर्नांडीस पार्टीस एकत्र आल्याचे दिसत आहे. प्रवेशव्दारासमोर बोनी व अर्जुन कपूर पाहुण्यांचे स्वागत करत असतानाच सलमानची एन्ट्री होते. तो सगळ्यात आधी तिथे उभी असलेल्या कतरिनाची भेट घेतो. पण तिच्या बाजूला उभ्या असलेल्या अर्जुनकडे ढूंकूनही पाहत नाही. तो सरळ बोनींकडे जातो. बोनी सलमानच्या कपाळावर किस करुन त्याचे आनंदाने स्वागत करतात. बाजूला उभा असलेला अर्जुन तिरप्या नजरेने हे सगळं बघतो आणि तिथून निघून जातो असे व्हिडिओत दिसत आहे.

बोनी व सलमान एकमेकांच्या खूप जवळ आहेत. बोनींच्या पडत्या काळात एक रुपयाही मानधन न घेता सलमानने त्यांच्या ‘नो एन्ट्री’ या सिनेमात काम केले होते. तेव्हापासून बोनी व सलमान चांगले मित्र झाले आहेत. मात्र सलमानची वहिणी व अरबाज खानची पत्नी मलाईका अरोरा व अर्जुन यांच्यात जवळीक वाढल्याने सलमान व अर्जुनमध्ये वाद झाला होता. सलमानने अर्जुनला मलाईका पासून लांब राहण्याचा इशारा दिला होता. अरबाज व मलाईकाच्या घटस्फोटास अर्जुनच जबाबदार असल्याचे सलमान मानतो. यामुळे त्यांच्यातून विस्तव जात आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.