दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण, अरमानला न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीला शनिवारी सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांतर्फे सरकारी पक्षाने अरमानच्या पोलीस कोठडीत वाढ मागितली होती, मात्र ऍट्रॉसिटीच्या गुह्यांची सुनावणी करणाऱया विशेष न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळली आणि अरमानची 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

अरमानच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. कानडे यांच्यापुढे हजर केले होते. यावेळी सरकारी पक्षाने दर्शनच्या मोबाईलचा न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. दर्शनने अरमानला ‘मुझे माफ कर दे, मै मुंबई छोड कर घर जा रहा हुं,’ असा संदेश पाठवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस महासंचालकांनी तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.