
जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्यानंतर हिंदुस्थानविरोधात इस्लामिक कार्ड खेळणाऱ्या पाकिस्तानला तगडा धक्का बसला आहे. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा काढून त्याचे विभाजन करण्याच्या निर्णयावर सौदी अरेबियाने हिंदुस्थानला साथ दिली आहे. सौदीने हिंदुस्थानच्या निर्णयाचे समर्थन केल्याने पाकिस्तान धक्का बसला आहे. जगभरातील इस्लामिक राष्ट्रांपैकी प्रमुख राष्ट्र म्हणून सौदीकडे पाहिले जाते. सौदीने कलम 370 वर हिंदुस्थानला साथ दिल्याने हा केंद्र सरकारच्या कुटनितीचा विजय मानला जात आहे.
बुधवारी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान डोवाल यांनी सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची रियादमध्ये भेट घेतली. तब्बल दोन तास दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीदरम्यान सौदीने कलम 370 रद्द करण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर आपले मत मांडले आणि या निर्णयास समर्थन दिले.
Saudi Arabia endorses India’s actions in Kashmir
Read @ANI story | https://t.co/179lzwNZFT pic.twitter.com/WV4kt5Uemu
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2019
अजित डोवाल आणि प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या बैठकीमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘बैठकीदरम्यान जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. जम्मू-कश्मीरसंदर्भात हिंदुस्थानने उचललेल्या पावलाचे आम्ही समर्थन करतो.’
इम्रान यांची सौदीची वारी फेल
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच सौदी अरेबियाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जम्मू-कश्मीरचा मुद्दा सौदीपुढे मांडला होता आणि यावर समर्थनाची मागणी केली होती. त्यावेळी सौदीने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता इम्रान यांची पाठ वळताच सौदीने हिंदुस्थानला साथ दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार
कलम 370 च्या समर्थनासाह सौदीने हिंदुस्थानमध्ये 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची आणखी जळाली आहे. 2030 पर्यंत सौदी अरेबिया देशाच्या अर्थव्यवस्थेवरील तेलाची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सौदीने हिंदुस्थानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

























































