
>> देवेंद्र भगत
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून केली जाणारी पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यामध्ये जीवितहानीचा धोका असणारे ‘मॅनहोल’ सुरक्षित करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवून मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरातील मॅनहोलवर संरक्षक लोखंडी जाळय़ा बसवल्या आहेत. त्यामुळे पावसाळय़ात मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबई शहर आणि पूर्क-पश्चिम उपनगरांतील किभागात पाकसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत पर्जन्य जलकाहिन्यांचे जाळे बसवण्यात आले आहे. यामध्ये पाइप, पेटिका आणि आर्च ड्रेनचा समाकेश आहे. या जाळय़ांच्या देखभालीसाठी मॅनहोल (मनुष्य प्रकेशिका) बसकण्यात आल्या आहेत, मात्र या खोल जलवाहिन्या उघडय़ा राहिल्यास त्यामध्ये पडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पालिकेच्या सेवेत असलेले पोटविकारतज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यामुळे धोकादायक मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसवण्यात येत आहेत. अतिवृष्टी झाल्यास काही ठिकाणी साचणाऱया पाण्यात मॅनहोल उघडा असल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहर आणि दोन्ही उपनगरांतील मॅनहोलवर जाळय़ा बसवून ते सुरक्षित करण्यात आले आहेत. शिवाय पाणी साचणाऱया नवीन ठिकाणांमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळय़ात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विभागांत अनुक्रमे 91 हजार 998 आणि 2 लाख 43 हजार 180 पर्जन्य जलवाहिन्यांच्या मनुष्य प्रवेशिका आहेत.
टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या कामासाठी सन 2019-20 या वर्षाकरिता अर्थसंकल्पात या कामांसाठी 3 कोटी 12 लाख 18 हजार रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. शहर विभागात 47 वर्तुळाकार आणि 295 आयताकृती मनुष्य प्रवेशिकांवर लोखंडी जाळय़ा लावण्यात येणार आहेत.
समाजकंटकांचे आव्हान
काही ठिकाणी समाजकंटकांकडून पालिकेने मॅनहोलवर बसवलेल्या संरक्षण लोखंडी जाळय़ा काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होते. गेल्या वर्षी 7 जून रोजी माटुंग्याच्या फाइव्ह गार्डन येथील मॅनहोलचे झाकण काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक उघडण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
सर्व मॅनहोल सुरक्षित करणार
पालिकेचे पर्जन्य जलवाहिन्या खाते, मलनिस्सारण वाहिन्या खाते, मलनिस्सारण प्रचालन खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी अशा विविध खात्यांशी संबंधित मुंबईत विविध ठिकाणी एक लाखांवर मॅनहोल आहेत. देखभाल-दुरुस्ती आणि सफाईसाठी कंत्राटदार, पालिका कर्मचाऱयांकडून हे मॅनहोल उघडण्यात येतात, मात्र हे मॅनहोल उघडे राहिल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मॅनहोलवर संरक्षक लोखंडी जाळय़ा बसविण्यात येत आहेत.
असे झाले काम
पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत पर्जन्यजल वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षा करण्यात येते. यामध्ये विभागाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणानुसार शहर विभागात पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी 1743 मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसविण्यात आल्या आहेत, तर या वर्षी शहर विभागात 1308 आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील 1023 मॅनहोलवर जाळय़ा बसविण्यात आल्या आहेत.





























































