
>> सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
अत्यंत प्रसिद्ध अशा आसनांपैकी योग, तप, संध्यावंदना, ध्यानधारणा, प्रार्थना आणि आसने या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले आसन म्हणजे पद्मासन. पद्म अर्थात कमळ हे हिंदुस्थानी संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. आपल्या देवी-देवतांचे, साधू-संतांचे, ऋषी-मुनींचे आणि योगसाधकांचे हे प्रिय आसन आहे.
सृष्टी-निर्माता ब्रह्मदेव, ऐश्वर्य आणि संपन्नतेची देवता श्रीलक्ष्मी आणि विद्येची अधिष्ठात्री देवता शारदा-सरस्वती या पद्मासनात अर्थात कमळावर बसलेल्या दिसतात. श्रीविष्णूंच्या करककमळामध्ये आणि श्रीलक्ष्मीच्या वरद हस्तामध्ये पद्म आहे. आपल्या साधू आणि योग्यांच्या, जैन तीर्थंकरांच्या मूर्ती पद्मासनात आढळतात.
रामरक्षेत प्रभू श्रीरामांचे वर्णन करताना म्हटले आहे,
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं।
पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्।।
ऋषी आणि देवगणांनी परिवेष्टित अशा योगेश्वर शिवशंकरांचे वर्णनही पद्मासनातच केलेले आहे.
‘पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्ववद्यं निखिलभयहरं पत्रवत्रं त्रिनेत्रम।’
योगशास्त्राप्रमाणे पद्मासन
हटयोग प्रदीपिका म्हणते,
‘चतुरशीत्यासनानि शिवेन कथितानि च
ताभ्यां चतुष्कमादाय सारभूतम् ब्रवाम्यहं’
चौऱयाऐंशी लक्ष आसनांमधील प्रमुख अशी चार आसने म्हणजे
‘सिद्धम् पद्मम् तथा सिम्हम् भद्रं वेति चतुष्टय़म्’
सिंहमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. या श्लोकांवरून पद्मासनाचे स्थान योगाभ्यासामध्ये किती वरच्या स्तराचे आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
आसन कोणी करू नये
ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाच्या मागील स्नायूबंध (Ligaments) यांना दुखापत झालेली आहे किंवा पायांची, गुडघ्यांची शस्त्र्ाक्रिया झालेली आहे, अशा लोकांनी पद्मासन करू नये. ज्या लोकांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, जे लोक बराचवेळ एका जागी पंबरदुखीमुळे बसू शकत नाहीत, त्यांनीही पद्मासनाचा अभ्यास करू नये.
कसे करावे
प्रथम आपले दोन्ही पाय पसरून ठेवावेत. नंतर आपला उजवा पाय दुमडून उजव्या पायाचे पाऊल डाव्या मांडीवर ठेवावे. डावा पाय दुमडून डाव्या पायाचे पाऊल उजव्या मांडीवर ठेवावे. पावलांच्या टाचा ओटीपोटावर थोडा दाब येईल, अशा प्रकारे ओटीपोटाला चिकटवून ठेवाव्यात. पावलांची बोटे मागच्या बाजूला वळवून ठेवावी. पावले वरच्या बाजूला वळवून ठेवावीत. थोडय़ावेळाने पायांची स्थिती बदलावी. आपल्या पायांची हाडे एकमेकांवर येऊन त्यांचा दबाव एकमेकांवरती पडल्याने पद्मासनात सुरुवातीला पाय थोडे दुखू शकतात. बोटे मागे वळून ठेवल्याने आपल्या पावलांचे सांधे खेचले जातात आणि तिथेही थोडी वेदना होऊ शकते तरीही नित्य नियमाने पद्मासनाचा थोडावेळ तरी अभ्यास करावा. अभ्यासाची वेळ हळूहळू वाढवत न्यावी. हे आसन करण्यास थोडे कठीण आहे.
आपले डोळे बंद करावे आणि शांतपणे आपल्या शरीरातील एकेका अवयवावर लक्ष पेंद्रित करून तिथला तणाव आणि ताठरपणा काढून टाकावा. सर्वप्रथम आपल्या पायांचे स्नायू ढिले करावे. पंबर, खांदे आणि मान सहज राहू द्यावे. शरीरात कुठेही तणाव अथवा ताठरपणा शिल्लक राहू देऊ नये. आता लक्ष आपल्या चेहऱयावरती पेंद्रित करावे. मनात आणि चेहऱयावर प्रसन्न भाव असू द्यावेत. प्रसन्न आणि शांत मनाने निश्चल बसून राहावे. साधारणतः पाच क्षण (मिनिटांपर्यंत) पद्मासनाचा अभ्यास करावा. सोबत ओंकाराचा जप करावा.
पद्मासनाचे लाभ
पायाचे तळवे आणि सांधे खेचले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी रुधिराभिसरण उत्तम प्रकारे होते. गुडघ्यांना थोडा व्यायाम मिळतो.
नितंब आणि कमरेच्या स्नायूंमधील जडता कमी होते. तिथे लवचिकता येते.
ओटीपोटाच्या आतील अवयवावर या आसनाचा चांगला प्रभाव पडतो.
शरीरातील नाडय़ांची शुद्धी होते.
प्राणायाम आणि कपालभाती यांच्या अभ्यासासाठी पद्मासन हे उत्तम आहे.
बद्ध-पद्मासन, उत्थित पद्मासन, कुक्कुटासन, मत्स्येंद्रासन, लोलासन, मत्स्यासन अशा अनेक आसनांचा प्रारंभ हा पद्मासनातूनच होतो.

























































