
>> अशोक डुंबरे
दूरदर्शनच्या नोकरीनिमित्त महाराष्ट्रातील अभयारण्यं आणि तिथल्या अधिवासाचे चित्रीकरण करता आले, ही जंगल सफर चित्रीत करून लोकांना चांगले कार्पाम देता आले याचं समाधान आजही मला मिळत आहे. दूरदर्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांना असे कार्यक्रम घरी बसून पाहता आल्याने त्या काळात ते लोकप्रियही ठरले. दूरदर्शन व वन विभाग यांच्या सहकार्यामुळे हा अनुभव मला प्राप्त झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर दरवर्षी वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. पृथ्वीतलावरील नैसर्गिक सृष्टीचे, मनुष्यप्राण्यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. सृष्टीतील असणारे चराचर घटक यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. ही एक प्रकारची साखळी आहे. तसेच निसर्गातील झाडे, वनस्पती, प्राणी, सूर्यप्रकाश, मानव एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांचा एक प्रकारचा जीवपाम असतो. हे एक पा आहे. या दृष्टीने पर्यावरण संवर्धन करणे महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
पौराणिक काळाचा विचार करता वन्य प्राणी आणि माणूस यांच्या सीमा किंवा रेषा अधोरेखित केल्या होत्या. रामायण काळात राम, लक्ष्मण, सीता दंडकारण्यात वास्तव्यास होते. सीतामाईला लक्ष्मणरेषा आखून दिली होती. माणसाने सीमा ओलांडू नये. वन्य प्राणी, माणूस वेगळे अस्तित्वात आहेत, असा याचा अभिप्रेत अर्थ होता. जिम कार्बेट हे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांचे वडील पोस्टमास्तर म्हणून हिंदुस्थानात नोकरीला होते. जिम कार्बेट वनखात्यात नोकरीला होते. ते एक उत्तम शिकारी होते. त्यांनी वाघाच्या शिकारी केल्या होत्या. त्या वेळी त्यांनी अरण्याचा, प्राण्यांचा अभ्यास केला होता. त्यावर त्यांनी पुस्तके लिहिली. उत्तराखंड येथे ‘जिम कार्बेट’ नावाचं अभयारण्य अस्तित्वात आहे.
महाराष्ट्रात एकूण 55 अभयारण्ये आहेत. सहा टायगर प्रोजेक्ट आहेत, राष्ट्रीय उद्याने आहेत. या सर्वांची देखभाल, व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक, वाईल्ड लाईफ हे अधिकारी महाराष्ट्र शासनातर्फे नेमलेले असतात. हे एकच अधिकारी आणि त्यांचा हाताखाली असलेला कर्मचारी वर्ग अभयारण्याची देखभाल आणि व्यवस्थापन अव्याहतपणे करत असतात. हे काम अत्यंत जिकिरीचे, जबाबदारीचे, आव्हानात्मक असे असते. दूरदर्शनच्या काळात मी निर्माता म्हणून वीस वर्षे काम केलं. बऱयाच वेळा ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामात अभयारण्यावर कार्पाम करून प्रक्षेपित केले होते. या सर्व कार्पामाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे प्रसिद्धी खाते आणि प्रत्यक्षात फिल्डवर काम करणारे कर्मचारी यांचे सहकार्य मिळालं म्हणूनच मला यश मिळालं.
सोलापूर जिह्यात नान्नज या गावात एक अभयारण्य आहे. यामध्ये माळढोक नावाचा दुर्मिळ पक्षी तसेच हरणांचे कळप त्यावेळी आढळून आले. माळढोक हा पक्षी दुर्मिळ असा आहे. तो पक्षी नामशेष होत चालला आहे, परंतु त्याचं संवर्धनाचं काम चालू आहे. उंच असा हा पक्षी गवताळ प्रदेशातच आढळतो. मी आणि माझ्या सहकाऱयांनी दोन-तीन वेळा या भागात जाऊन चित्रीकरण केले. पहिले चित्रीकरण केले त्या वेळी अशोक साळुंखे हे सोलापूरला अधिकारी होते. त्यांच्या सहकार्याने हे चित्रीकरण यशस्वी झाले. या माळरानावर हरणांचे कळप पण आढळले. हरणं अत्यंत चपळ असतात अन् वेगाने धावतात. माणसाचा अंदाज त्यांना पटकन येतो. माणसाचा वास आल्याबरोबर हरणाचा कळप आपल्या समोरून चौफेर उडय़ा मारत अदृश्य होतो. या कळपापाशी चित्रीकरण करणे अत्यंत अवघड होते, परंतु बऱयाच प्रयत्नांनंतर त्यात यश मिळाले आणि हा लघुपट पूर्ण झाला.
कोल्हापूर जिह्यातील राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथे गवा अभयारण्य आहे. पूर्वी हे कोल्हापूर संस्थानच्या मालकीचे वनक्षेत्र होते. त्यांनी तेव्हादेखील या गावाचे संरक्षण केले होते. कालांतराने हे खासगी क्षेत्र वन विभागात सामील झालं. गवा हा म्हशीच्या कुळातील प्राणी प्रचंड शक्तिशाली असून प्रसंगी वाघ, सिंहाशी झुंज देऊ शकतो. गवा सहा फूट उंच असू शकतो. त्याला संरक्षणासाठी निसर्गानं शिंगं दिलेली असतात. त्याचे वजन 1500 ते 1600 किलो इतकं असतं. गवा शाकाहारी प्राणी असून गवत, झाडांचा पाला वगैरे खाऊन जीवन जगतो. हा कळप करून राहतो. नर गवा कळपाचा मुख्य असतो. त्याच्या बरोबर इतर माद्या वगैरे असतात. जन्मलेल्या पिलाचे संरक्षण करणे, संगोपन करणे, वाघ, सिंह, चित्ता यांपासून संरक्षण करणे हे काम त्या करतात. दूरदर्शनच्या कारकीर्दीत दोन-तीन वेळा त्या कार्पामाला चित्रीकरणासाठी दाजीपूरला गेलो होतो तेव्हा फॉरेस्ट खात्याचे प्रसिद्ध अधिकारी निगवेकर होते. त्यांच्या सहकार्याने चित्रीकरण करता आलं. दोन-तीन दिवस मुक्काम केल्यानंतर मनासारखं शूटिंग झालं. बऱयाच वेळा मी पायी फिरून रस्त्यावरूनच ते गवे चरताना किंवा झाडाच्या आडोशाला उभे राहिलेले दिसले होते. आवाज न करता जवळ जाऊन चित्रीकरण केलं आणि चांगल्या कार्पामाची निर्मिती करता आली.
मायणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे पक्षी अभयारण्य आहे. येथे एक मोठा नैसर्गिक तलाव आहे. या तलावावर चारशेपेक्षा जास्त पक्ष्यांच्या विविध जाती आढळतात. उदाहरणार्थ, ब्राह्मी बदक, कूट कॉमन, स्पून बिल, ब्लॅक आयबिश स्टार्क, नॉदर्न शोवेलर, किंगफिशर तसेच हिवाळी हंगामात परदेशी पक्षी इथे आवर्जून येतात. उदाहरणार्थ, सारस पक्षी यांना फ्लेमिंगो म्हणतात ते सैबेरिया देशातून हिवाळ्यात येतात. किडे, मासे, खेकडे यांच्यावर त्यांची उपजिविका चालते. येथे त्यांना हे खाद्य विपुल प्रमाणात मिळतं. मी एकदा मायणी येथे चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्या वेळी कॅमेरामन नसल्यामुळे मी आणि एक टेक्निशियन होते मुंगळे, आम्ही दोघं मिळून मुक्काम केला. रात्रीच फॉरेस्ट खात्याने तळ्याकाठी एक झोपडीसारखं बसण्यासाठी आणि चित्रीकरणासाठी बैठं मचाण उभं केलं होतं. पहाटे मी आणि टेक्निशियन त्यात जाऊन बसलो आणि सूर्योदय होताच पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला. विशेष म्हणजे त्या वेळी माझे मित्र सोमनाथ स्टेशन इंजिनीअर यांनी मला मापोलेन्स दिली होती. त्यामुळे मला हे चित्रीकरण झूमच्या साहाय्याने चांगलं करता आलं. त्याचं फोकसिंग अतिशय कठीण होतं. लेन्स थोडी जरी हलली तरी फोकस व्हायचं, परंतु मोठय़ा प्रयत्नाने चित्रीकरण केलं. पुण्यात आलो त्या वेळी फॉरेस्टच्या प्रसिद्धी खात्यात जोगळेकर नावाचे गृहस्थ होते, त्यांनी पक्ष्यांची नावे ओळखायला मदत केली. मी स्वत संपादन करून तो कार्पाम निवेदन, पार्श्वसंगीत लावून चांगल्या प्रकारे निर्माण केला, जो लोकांना खूप आवडला. मलासुद्धा माझंच कौतुक वाटलं. कारण मी इतकं चांगलं करू शकलो.
पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर हे ठिकाण सर्वांना माहीत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं महादेवाचे स्थान आहे, परंतु भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे. भीमाशंकरी खार म्हणून एक प्राणी इथल्या जंगलात राहतो. तो खारीसारखा असतो, परंतु खूप मोठा असतो. त्याला ‘शेकरू’ म्हणतात. याची शेपूट खूप लांब असते. तो उंच झाडावर शेंडय़ावर आपली घरटी बांधतो. या झाडावरून त्या झाडावर टणाटण उडय़ा मारणारा अतिशय चपळ असा हा प्राणी माणसांचा वास आला की, पटकन अदृश्य होतो. या वेळीसुद्धा मला चित्रीकरणाची संधी मिळाली. ऐन वेळी कॅमेरामन येऊ शकला नाही म्हणून मी आणि टेक्निकल असिस्टंट घेऊन भीमाशंकरला गेस्ट हाऊसमध्ये दोन दिवस मुक्काम केला. त्यावेळी फॉरेस्ट खात्याचे प्रसिद्ध अधिकारी निगवेकर हे होते. पहाटेच आम्ही पायी पायी जंगलात पोचलो आणि दबा धरून बसलो. स्टॅंडवर शूटिंग करणे शक्यच नव्हते म्हणून ट्रायपॉडच्या साह्याने कॅमेरा खांद्यावर ठेवून उंच झाडावर असणाऱया प्राण्याचे चित्रीकरण करावे लागले. दोन दिवसांच्या आत मनासारखे चित्रीकरण झाले आणि चित्रीकरण संपादित करून भीमाशंकरमधील खार लोकांना दूरदर्शनच्या माध्यमातून घरबसल्या पाहायला मिळाली. मलासुद्धा एक चांगला अनुभव मिळाला. ते शूटिंग मी कधीच विसरणार नाही. अजूनही त्याची आठवण आहे.
अमरावती जिह्यात मेळघाट हे एक अभयारण्य आहे. तेथेही जाण्याचा योग आला. त्या वेळी माधवराव गोगटे संचालक होते आणि उपसंचालक होते मारुती चितमपल्ली. त्यांच्याशी मुक्कामात खूप गप्पा मारता आल्या. त्यांनी आपले अनुभव सांगितले. चितमपल्ली साहेबांचे आता नव्वदीच्या पार गेलेले वय आहे. त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. त्यांचा सहवास मिळाला, अनुभव ऐकता आले हे माझे भाग्य समजतो. आम्ही त्या वेळी आठवडाभर मेळघाट अभयारण्यात मुक्काम केला होता. सकाळी पहाटे उठून वन विभागाच्या गाडीतून चक्कर मारायचे आणि चित्रीकरण करायचे. हे अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे, पण दुर्दैवाने आम्हाला वाघाचे दर्शन घडलं नाही. त्याच्या पायाचे ठसे अगदी ताजे ताजे असे दिसले आणि फॉरेस्ट कर्मचारी आम्हाला सांगायचे, वाघोबाची स्वारी आताच येथून अर्ध्या तासापूर्वी गेलेली दिसते. इतका त्यांचा दांडगा अभ्यास होता, परंतु आम्हाला गवा, अस्वल, जंगली कुत्रे आणि इतर प्राणी दिसले. मन फार खट्टू झालं. गोगटेसाहेबसुद्धा म्हणाले, मीसुद्धा इतके दिवस येथे आहे, परंतु मलाही वाघ दिसला नाही, वाघ पाहण्याचं भाग्य आणि योगायोग लागतो. असो.
दूरदर्शनच्या नोकरीनिमित्त जंगल सफर करून चित्रीकरण करून लोकांना चांगले कार्पाम करता आले हे मोठं काम करता आलं याचं समाधान आजही मला मिळत आहे. या लेखासाठी वनरक्षक रमेश खरमाळे, माझे वर्गमित्र निवृत्त वनसंरक्षक विठ्ठल पत्की आणि फॉरेस्ट विभागातील निवृत्त आर्टिस्ट अशोक जुन्नरकर यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे मला हे लेखन करता आले.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)































































