मनतरंग – उलगडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

चाळीस ते पंचेचाळीस या वयोगटातील महिलांना रितेपण, एकटेपण, औदासीन्य यायला लागल्याची उदाहरणं हल्ली आढळून येत आहेत. रजोनिवृत्तीच्या पूर्वी किंवा त्या काळात ही स्थित्यंतरं महिलांना येऊ शकतात. पण त्याच्याच जोडीला मनात असुरक्षिततेची भावना असेल तर त्यांना एकटेपणा आणि औदासिन्य जाणवत राहतं. ही असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यामागचे कारण हे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं असतं. त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, तिची लहानपणापासून झालेली जडणघडण, आजूबाजूला असलेल्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ह्या सगळ्याचा प्रभाव व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱया विचार आणि भावना यांवर असतो. त्यामुळेच अशा प्रकारच्या समस्यांकरता समुपदेशन घेणाऱया महिलांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

रचना (नाव बदलले आहे) ह्या मध्यमवयीन गृहिणी होत्या. त्यांचे घर हे सुखवस्तू होते. त्यांना एक नऊ वर्षांची मुलगी होती. नवरा घरचा बिझनेस बघत होता. त्यांच्या घरी त्यांचे सासरे आणि धाकटा दीर असे त्यांचे पाच जणांचे एकत्रित कुटुंब होते. घरची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. तसेच संसारही अगदी व्यवस्थित होता. पण असे असूनही रचना ह्या मनातून आनंदी नव्हत्या. एक कुठेतरी रितेपण त्यांना जाणवत राहात होते. त्या कंटाळल्या होत्या.

“कळत नाही का, पण आता मला संसाराचाच कंटाळा आलाय. मी स्वतला बिझी ठेवण्याचा प्रयत्नही करतेय. पण कशातच मन लागत नाही. दुपारपर्यंत कामं असतात. मात्र दुपारनंतर मात्र उदास-उदास वाटायला लागतं. ही उदासी जास्त वाढत जाण्याचं कारण म्हणजे माझ्या घरातल्यांना कशाचं सोयरसुतक नसणं. मुलगी तशी लहान असल्याने तिला आई का शांत असते हे माहीत नसतं. ती अभ्यास आणि तिचे फ्रेन्ड्स यात असते. नवरा हा बिझनेस सांभाळतो. त्यामुळे तो रात्री उशिरापर्यंत फॅक्टरीत असतो. आल्यावर मग जेवण, टी.व्ही, झोप हे त्याचं रुटीन आहे. सासरे आणि दीर त्यांच्या त्यांच्या विश्वात. मला काय होतंय, काय झालंय हे कोणाच्याही खिजगणतीतच नाहीये. आज मी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत झोपतच नाही. कंटाळा घालवण्यासाठी मोबाइलवरचं काहीही बघत असते. मोबाइलची बॅटरी डाऊन झाली की झोपायला जाते…”
रचना बोलतच होत्या. सांगताना त्यांचे डोळे मध्येच पाणावतही होते. त्यांची आतल्या आत मानसिक घुसमट होत होती हे स्पष्ट त्यांच्या बोलण्यातून जाणवतही होते. पण ती घुसमट नक्की कशामुळे होती हेच त्यांना समजत नव्हतं. दुसरी गोष्ट त्यांच्याशी बोलताना जाणवली ती म्हणजे, घरातल्या मंडळींचा त्या करत असलेला पराकोटीचा दु:स्वास. जो त्यांच्या बोलण्यातून परोपरी व्यक्त होत होता. अर्थातच तो राग का उफाळून येत होता हे त्यांना समजत नव्हतं.

चाळीस ते पंचेचाळीस या वयोगटातील महिलांना हे रितेपण, एकटेपण, औदासीन्य यायला लागल्याची उदाहरणं हल्ली आढळून येत आहेत. रजोनिवृत्तीच्या पूर्वी किंवा त्या काळात ही स्थित्यंतरं महिलांना येऊ शकतात. पण त्याच्याच जोडीला मनात असुरक्षिततेची भावना असेल तर त्यांना एकटेपणा आणि औदासीन्य जाणवत राहतं.

आता ही असुरक्षिततेची भावना का निर्माण होते ह्याचं उत्तर हे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं असतं. त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, तिची लहानपणापासून झालेली जडणघडण, आजूबाजूला असलेल्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ह्या सगळ्याचा प्रभाव व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱया विचार आणि भावना यांवर असतो. त्यामुळेच अशा प्रकारच्या समस्यांकरता समुपदेशन घेणाऱया महिलांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

आपल्या समाजरचनेत स्त्री ही सोशिक गणली गेली आहे. त्याचबरोबर तिने समर्थपणे जबाबदाऱया पेलण्याच पाहिजेत अशा अघोषित अपेक्षाही समाजातून असतात. त्यामुळे ज्या स्त्रिया मनाने हळव्या, संवेदनशील आणि / किंवा कमी व्यक्त होणाऱया असतात; त्यांची आतल्या आत घुसमट होण्याची आणि जर योग्य वेळी योग्य ती मदत न घेतल्यास त्यांना शारीरिक आणि/किंवा मानसिक अस्वास्थ्याचा त्रास जाणवतोच.

रचना ह्या वरील प्रकारात मोडणाऱया होत्या. कित्येक वर्षं त्यांनी मूकपणे निभावून नेली खरी; पण रजोनिवृत्तीच्या उंबरठय़ावर त्यांना त्रास जास्तच जाणवू लागला. त्यात त्यांचा स्वभावही कारणीभूत झाला. त्यांना नवऱयाकडून अधिकच अपेक्षा होत्या. (त्याने मी न सांगता माझ्या मनातले ओळखलेच पाहिजे.) त्यांच्या नवऱयाला ह्याची कल्पनाच नव्हती. ‘माझ्या नवऱयाचे माझ्याकडे लक्ष नाही. मी त्याच्यासाठी भरपूर सॅािढफाईज केलंय ना,’ अशा आणि अशा विचारसाखळीत रचना गुंतत चालल्या होत्या. एकटय़ाच स्वतशी झगडत होत्या आणि हा त्यांचा झगडा ‘मला माझ्या घरच्यांनी विचारलं नाही तर माझे काहीच मोल नाही’ ह्या अतार्किक विचारांशी होता. त्या याच एका विचारांत अडकल्यामुळे रचना त्यांच्या तर्काशी सुसंगत (मिळत्याजुळत्या) अनुभव, उदाहरणे यांची जुळवाजुळव करत राहात होत्या. या सर्वांचा परिणाम व्हायचा तोच होत होता. रचना यांचे मनस्वास्थ्य बिघडत चालले होते. त्यामुळे समुपदेशनाचे पहिले उद्दिष्ट हे त्यांच्या विचारांवर आणि अतार्किक समजांवर काम करणे हे होते. त्यासाठी त्यांच्या मनात येणाऱया प्रत्येक त्रासदायक विचारांचा त्यांना त्रयस्थ दृष्टीने अभ्यास करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला रचना स्वतचे हे त्रासदायक विचार वहीवर उतरवून काढत. ती वही समुपदेशन सत्रांत आणत आणि मग त्यावर चर्चा होई. या चर्चांदरम्यानच त्यांना हळूहळू वस्तुस्थितीचा उलगडा होऊ लागला.

‘आपण अतिविचार करतोय आणि त्यांच्या जाळ्यात अडकतोय,’ ही जाणीव झाल्याबरोबर त्यांनी ते त्रासदायक विचार बदलण्यासाठी मेहनत घेतली. याचा परिणाम म्हणजे त्यांचे रागावर आणि ताणावर नियंत्रण आले. काही गोष्टींचा त्यांनी स्वीकार केला जसे की,

आपल्या मनात कोणालाही (नवऱ्यालाही) शिरता येणे अशक्य आहे. ही जाणीव झाल्याक्षणी रचना यांना कमालीचे मोकळे वाटायला लागले. त्यांनी स्वतला कामांमध्ये आणि छंदांमध्ये बिझी करून घेतले. आज रचना सुखी-समाधानी आयुष्य जगत आहेत. त्यांना आता त्यांच्या संसारात पुन्हा रस आला आहे. पुढच्या आठवडय़ात त्या घरातल्यांबरोबर सहलीला जात आहेत आणि त्यांनी स्वत पुढाकार घेऊन ही टूर प्लॅन केली आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
[email protected]