आरोग्य – लठ्ठपणावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी करण्याच्या उद्देशाने केलेल्या विविध प्रकारच्या शस्त्र्ाक्रियांना एकत्रित बॅरिएट्रिक सर्जरी किंवा वजन कमी करण्याची शस्त्र्ाक्रिया म्हणून ओळखले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर, बॅरिएट्रिक शस्त्र्ाक्रियेमुळे पोटाचा आकार कमी होतो ज्यामुळे भुकेवर नियंत्रण मिळवून त्या रुग्णाची भूक कमी होते. वजन कमी करण्याच्या शस्त्र्ाक्रियेची तयारी करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्थिती, दोन्ही तितक्याच आवश्यक आहेत. सर्व सवयीतील बदलांसाठी तीव्र इच्छाशक्तीची आवश्यकता असते. बॅरिएट्रिक शस्त्र्ाक्रिया अशी आहे की, त्याचा परिणाम तुमच्या भुकेवर नक्कीच होते आणि तुम्हाला आहारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. योग्य प्रकारच्या आहाराबरोबरच व्यायामाची जोड असणे आवश्यक आहे. करता शरीरासाठी पोषक अन्नपदार्थ निवडणे महत्त्वाचे आहे. केवळ चवीकरता जिभेचे चोचले पुरविणाऱया अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा आणि आहारातील पदार्थांमधील पोषक तत्त्वे जाणून घ्या.

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची मानसिक तयारी

– शस्त्रक्रियेपूर्वी, एखाद्याच्या आरोग्याचे मूल्यांकन केले जाते आणि सर्जनने हिरवा कंदील दाखवला तरच ती व्यक्ती शस्त्रक्रियेस पात्र ठरते. पोषण तज्ञांची टीम शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना त्यांची जीवनशैली बदलण्यास मदत करते आणि त्यानुसार मार्गदर्शन करते. पोषण तज्ञांच्या बाजूने 99 टक्के नियोजन करण्यासाठी रुग्णाच्या बाजूने एक टक्का प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जेथे रुग्ण निष्काळजी आहे किंवा मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणारा असेल तर अनावश्यक गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी आहारावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

– बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेमध्ये शरीरशास्त्रीय बदल केले जातात. आरोग्य समस्या वाढू नये म्हणून या बदलांसाठी काळजी आणि वर्तणुकीतील बदल आवश्यक आहेत. मद्यपान, चहा आणि कॅफिनयुक्त पदार्थ यांनी आम्लपित्त वाढू शकते आणि वजन कमी करण्यात व्यत्यय येऊ शकतो. शस्त्रक्रियेचे उत्कृष्ट परिणाम पाहिल्यानंतर बरेच रुग्ण प्रेरित होतात. जास्त प्रमाणात खाणे आणि, इष्टतम वजन राखाणं. याची ते स्वतः पुरेशी सावधगिरी बाळगतात. खरं तर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व्यक्तीला त्याच्या/तिच्या अन्न सेवनाचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल. कारण रुग्णाला संतुलित आहार घेण्याचा आणि तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला जातो.

शस्त्रक्रियेच्या मदतीने तुम्ही निरोगी राहू शकता आणि व्यसनावर नियंत्रण ठेवू शकता. आरोग्यदायी निवडींसह अस्वास्थ्यकर व्यसने बदला. जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही कोशिंबीर आणि प्रथिनांचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल आणि नंतर त्रास होणार नाही. आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आणि पोषक आहाराचे सेवन करा. आहारानंतर पोटाचा आकारही कमी होतो. उदाहरणार्थ, शस्त्र्ाक्रियेनंतर तुमचे पोट केकच्या तुकडय़ाने भरेल इतके लहान होते, परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही जेवणाऐवजी केकच्या तुकडय़ाने पोट भरायचे. तुमच्या ताटात वैविध्यपूर्ण आणि पोषक घटक असावेत. काही वेळा एखाद्या व्यक्तीला मानसशास्त्र्ाज्ञांच्या मदतीची आवश्यकता भासू शकते, परंतु शस्त्रक्रियेपूर्वीच आपल्या सवयींवर ताबा मिळवणे फार महत्त्वाचे आहे. जर एखाद्याने स्वतःचे जीवन सुधारण्यासाठी एक निकोप दृष्टिकोन ठेवून नियोजन केले तरच हे शक्य आहे.
 डॉ. मनीष मोटवानी
(लेखक आस्था बॅरिएट्रिक्स, सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेटाबॉलिक अँड बॅरिएट्रिक सर्जरी येथे मुख्य बॅरिएट्रिक सर्जन आहेत)