>> मलिका अमरशेख
तुमचं मन कुठल्याही बंधनात नसणं-परंपरा-अध्यात्म-सामाजिक रूढी ज्या तिला जाचक वाटतील अशा पुठल्याही बंधनात न अडकता आपल्या स्वतःच्या टर्म्स अॅण्ड कंडिशनवर जगताना दुसऱयाला न दुखवता जो माणूस किंवा स्त्री स्वतः समर्थपणे समाधानी असते; स्वतःचा विकास करतानाही जो दुसऱयाचाही विचार करतो तो खऱया अर्थानं मुक्त म्हणायला हरकत नाही.
‘मुक्ती’ हा शब्द मोठा विलक्षण आहे. आणि त्यातपण ‘स्त्र्ााr मुक्ती’ हा तर अजूनच गुळगुळीत फसवा शब्द!
21व्या शतकात अनेक विकास-स्थित्यंतर-बदल झाले. यंत्रात न् माणसातही झाले. पण स्त्री अधिकाधिक नवनव्या पाशात बद्ध झाली. ती नोकरी करू लागली-अंतराळात गेली-पण तरीही तिचं स्थान पुरुषांच्या समाजाच्या डोळय़ात तेच राह्यलं-दुय्यम!
इव्हन आज नोकरदार स्त्री ही नोकरीवरून आल्यावर स्वयंपाकघरात घुसते. तिचा पगार तिला मुक्तपणे खर्चायचं स्वातंत्र्य नाही.
आजही नवऱयाला मैत्रिणी असू शकतात, पण बायकोला मित्र? शांतम् पापम्! नवऱयाच्या बदल्या घरातले सहजपणे स्वीकारतात न् त्याचे तोटेही सोसतात, पण स्त्र्ायांच्या बदल्या किती घरात आनंदानं स्वीकारल्या जातात?
आपल्याहून मोठय़ा पदावर मोठय़ा पगारावर असलेली स्त्र्ााr पत्नी म्हणून किती नवरे अभिमानानं आनंदानं स्वीकारतात? संसार तुटायला नको. नवरे रुसायला नकोत म्हणून स्त्र्ााr किती तरी गोष्टींना सहन करते. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा स्वप्नांना मुरड घालते. बरं पैसे मिळवून स्वतःच्या पायावर उभं असणं-एकटं राहणं-आपल्याला हवा असलेला व्यवसाय करणं पिंवा लिव्ह इन रिलेशनशिपचा कसलीही सुरक्षितता नसलेला पर्याय निवडणं ही काही मुक्तीची व्याख्या नव्हे.
तुमचं मन कुठल्याही बंधनात नसणं-परंपरा-अध्यात्म-सामाजिक रूढी ज्या तिला जाचक वाटतील अशा कुठल्याही बंधनात न अडकता आपल्या स्वतःच्या टर्म्स अॅण्ड कंडिशनवर जगताना दुसऱयाला न दुखवता जो माणूस किंवा स्त्री स्वतः समर्थपणे समाधानी असतो; स्वतःचा विकास करतानाही जो दुसऱयाचाही विचार करतो तो खऱया अर्थानं मुक्त म्हणायला हरकत नाही.
मुक्ती म्हणजे जबाबदाऱया नाकारणं नाही. जबाबदारीनं जगणं म्हणजे मुक्ती. अस्तित्वाचं सजग भान म्हणजे मुक्ती. निसर्ग आणि पर्यावरणाचं भान ठेवून त्यांनाही जपणं हाही एक अर्थ आलाच.
मुक्ती आणि मोक्ष यात फार मोठा फरक आहे. मोक्षाचा अर्थ आपण फक्त अध्यात्मापुरताच घेतो, पण तो तितका मर्यादित नाहीय. सर्वसंग परित्यागृर-पूर्णतः स्थितप्रज्ञ प्रत्येक विकार-भावनांपासून दूर… हासुद्धा मोक्षच! कसलीच इच्छा नाही तर मोह, दुःखही नाही. बुद्धानं जो सिद्धान्त मांडला न् नंतर काषाय वरच पांघरून तो जगाचं-माणसाचं दुःख दूर करण्यासाठी जगला. आपल्या माणसांपासून दूर-ऐहिक सुखोपभोगापासून दूर.. हाही मोक्षच.
तर मुक्ती म्हणजे तुम्ही ऐहिक सुखभोग घेताही. पण तुमचं आयुष्य तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही जगता. कुणाचंही प्रेशर न घेता जगता!
आई, वडील, नवरा, व्यवस्था, समाज, देव, जाती, धर्म या कुठल्याही संकल्पना व व्यक्ती तुमच्या निर्णयावर वर्चस्व गाजवू शकत नाही इतका आत्मविश्वास तुमच्या ठायी असणं म्हणजेही मुक्ती! कदाचित तुमचे निर्णय चुकतीलही… पण मग त्याची किंमत चुकवायला तयार असणं म्हणजेही मुक्तीच! कारण नाहीतर तुम्ही वरील प्रत्येक सत्तेत अडपून परावलंबी होऊ शकता. लहानपणी एक खेळ होता. ‘शिवाजी म्हणतो उठा…’ तर अशा पद्धतीने नवरा, आई, वडील, समाज, व्यवस्था म्हणेल ती पूर्व दिशा! सर्वांनाच धोपटमार्ग म्हणूनच बरा वाटतो. कारण मग जगण्याची विचार करण्याची जबाबदारी एकदा का आई, बाप, नवरा, समाज, व्यवस्था यावर सोडली की झालं! मग सगळय़ा चुकांचं खापर आई-बाप ते थेट सरकार यावर पह्डता येतं न् आपण मात्र नामानिराळे!
स्त्री मुक्त होणं कठीण आहे; पण अशक्य नाहीय! प्रत्येकाची जगण्याची परिभाषा वेगळी असते. पण स्त्रीनं जगण्याची परिभाषा बदलली की समाजातला प्रत्येक घटक त्याचा विरोध करतो. तिच्या बाबतीत सहिष्णुता दाखवणं त्याला अशक्य वाटतं.
‘न स्त्र्ााr स्वातंत्र्यमर्हति’ असं पूर्वसुरींनी म्हटलंय तर त्याच वेळेला दुसरे ‘यत्त नार्थस्तु पुज्यन्ते’ असं त्याला छेद देत म्हणून गेलेत!
‘गृहलक्ष्मी’ असं साजरं गोजरं नाव देऊन तिला समाजपुरुषानं मान देण्याचा अविर्भाव केलाय, पण घर कर्त्या पुरुषाच्याच नावाचं असतं! महत्त्वाचे निर्णय तेच घेतात. अशा किती स्त्र्ाया आहेत ज्यांनी स्वतःच्या पगाराच्या पिंवा एफडी पिंवा तत्सम पैशातून स्वतःची प्रॉपर्टी केलीय? ज्यातून तिच्या हाती सत्ता येईल पिंवा तिचा आत्मविश्वास वाढेल असं काहीही घडू दिलं जात नाही.
साधं एक उदाहरण पहा… पूर्ण हिंदुस्थानात उद्योगपती किती आहेत? साखर कारखानदार किती आहेत? नाव पहा- सर्व पुरुष आहेत!
एकदोन शेलकी उदाहरणं फेकतात. कल्पना चावला पिंवा पायलट झालेली स्त्र्ााr पिंवा पंपनी संचालक-इव्हन भारतीय राज्य कारभारातही संसदेत पुरुषांची संख्या जास्त. स्त्र्ायांची कमी त्याही खूप काही महत्त्वाचं धोरण मांडतात असंही दिसत नाही. अगदी बंदूक हातात घेऊन धडाधड आपल्या शत्रूंना उडवणारी फूलनदेवीही संसदेत गेली. तरी तिनं काही क्रांतिकारक धोरण मांडली होती असं दिसत नाही. एकापरीनं समाजपुरुष पाय खेचतो न् दुसऱयापरीनं त्या स्वतःच मानसिक गुलामगिरीत बद्ध आहेत पिंवा सांसरिक जबाबदाऱयांतून त्या मोकळय़ा होऊ शकत नाहीत. जरी आज अत्याधुनिक तंत्रज्ञान हात जोडून तिच्या सेवेला आहे. फ्रीझ, मिक्सर, वॉशिंग मशीन, गॅस, पण तरीही तिची कामं ही अदृश्य व न संपणारी असतात. नवऱयाचा डबा-जेवण-मुलांचे डबे-शिक्षण-नाना सण-समारंभ त्यानिमित्ताने होणारी जेवणं-स्नॅक्स-फराळ.. तिचा उमेदीचा काळ यातच संपून जातो. मुलांची शिक्षण पूर्ण होऊन त्यांची लग्न झाली की तिला वाटतं की ती मुक्त झाली! पण मग दुसऱयाच साखळय़ा गळय़ात पायात पडतात!
कधी मुलं दूर गेल्यामुळे एकटेपणा येतो तर कधी शरीर साथ देत नाही. बरं अशा तऱहेच्या ‘मुक्त’पणाची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. शरीर साथ न दिल्याने परत दुसऱयावर अवलंबिणं येतं त्याचा त्रास वेगळा! एपूणात प्रश्नांपासून सुटका नाही. न् जोवर जीवन आहे तोवर वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे मुखवटे धारण करून येणारच! ‘याला जीवन ऐसे नाव’ पण ही काही मुक्ती नव्हे!





























































