>> मेधा पालकर
चित्रकार नयन बारहाते यांचे नुकतेच निधन झाले. नयन बारहाते यांचे शब्द-अर्थ-रेषा-प्रतिमा यांविषयीची त्यांची जाण उत्तुंग होती. ते संगीतप्रेमी होते. त्यांचा अभिजात गायकीचा अभ्यास होता. महाराष्ट्राच्या अव्वल चित्रकारांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ चित्रकार नयन बारहाते. त्यांच्या सगळ्या ऐतिहासिक कारकीर्दीमध्ये त्यांनी घडवलेले देशभरातील चित्रकार आणि आपल्या कामाचा ठसा उमटवून घडवलेला इतिहास नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे. ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत यांच्यापासून ते अतुल पेठे यांच्यापर्यंत नयन यांनी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक मोठय़ा व्यक्तीबरोबर काम केलं. ‘‘पुस्तकाचं कव्हर करावं तर नयन बारहाते यांनीच’’ असं त्यांच्याविषयी बोललं जायचं. ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यापासून ते डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या, देशातल्या अनेक चित्रकारांबरोबर नयन बारहाते यांनी काम केले. अनेक चित्रकार त्यांनी घडवले. आपल्या रंग-रेषांच्या भाषेला सामाजिक वेदनांची झालर लावणारा हा कलाकार आहे.दिलदारपणा आणि मनाचा मोठेपणा हे दोन गुण त्यांच्याकडे होते.1990मध्ये बारहाते नोकरीनिमित्त नांदेडमध्ये आले आणि नांदेडकर झाले.’सृजन कम्युनिकेशन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलाकार्याचा विस्तार केला. शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठs साकारली. त्यांच्या कुंचल्यातून मुखपृष्ठांची कलात्मक उंची वाढत असे. कलासाधनेतून त्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. केवळ राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱयातून लेखक आणि प्रकाशक नयन बारहातेंकडे मुद्दाम येत असत. ओघवत्या शैलीतून सूत्रसंचालन करणारा हा कलाकार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगत वाढवत असे. समोरच्याला आपलेसे करून घेण्याच्या दिलखुलास शैलीमुळे त्यांनी राज्यभर मोठा मित्रपरिवार कमवला. ताकदीचा कलावंत व चौफेर वाचन करणारे बारहाते मराठी, हिंदी साहित्यातील नवे प्रवाह, बदलती समीकरणे व नवलेखकांच्या लेखनावर भरभरून बोलत. कलात्मक जाहिरातींसाठी त्यांचा लौकिक होता. त्यांच्या हातातच जादू होती. पुस्तके, दिवाळी अंकांची मुखपृष्ठs साकारण्यासोबत पत्रिका, स्मृतिचिन्हे, अन्य विविध प्रकारची चित्रे, डिझाइन असे त्यांचे थक्क करणारे विपुल काम आहे. नांदेडसारख्या शहरात राहूनही त्यांनी सांस्कृतिक आणि कला जगतावर ठसा उमटविला. कष्टाने आणि निष्ठsने व्यावसायिकता सांभाळली. जगण्यातील असह्य संग्रामाचे भांडवल न करता ’दुनियादारी जगणारे व्यक्तिमत्त्व’ अशी त्यांची ओळख सांगावी लागेल. साहित्य, संगीत, चित्र आणि चित्रपट अशा सगळ्यांबाबत त्यांना वेगळी दृष्टी होती. माणसांचे त्यांचे आकलन रूढ चौकटीच्या पलीकडले असे. शब्द-अर्थ -रेषा -प्रतिमा यांविषयीची त्यांची जाण उत्तुंग होती .
ते रसिक संगीतप्रेमी होते.अभिजात गायकीचा अभ्यास होता. पॅलिग्राफीतही त्यांचे अफाट वेगळेपण होते . ते अक्षरांना सजीव करून मुखपृष्ठांना बोलायला लावायचे.त्यांची प्रत्येक निर्मिती म्हणजे एक विलोभनीय आविष्कार होता.नयन यांनी स्वतःचे नेत्र दान केले आहेत. मुखपृष्ठ तयार करताना फक्त चित्रकार असून चालत नाही तर चित्रकाराला तिसरा डोळा असावा लागतो. दोन डोळे पाहण्यासाठी व तिसरा डोळा कल्पना करण्यासाठी असावा लागतो. कल्पकतेचा तिसरा डोळा जेव्हा माझ्याकडे आहे याची जाणीव झाली तेव्हा मुखपृष्ठ तयार करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन काळात मुखपृष्ठ बनविताना पाहिले, तेव्हा आपल्याकडे असलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतो याची जाणीव झाली आणि माझा प्रवास मुखपृष्ठाकडे आपण वळलो असं स्वतः मुखपृष्ठकार नयन बारहाते सांगायचे.