वऱ्हाडीतील साहित्य मंथन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण बोपूलकर

बऱयाचदा काही अफलातून कल्पना साहित्यिकांच्या सुपीक डोक्यातून प्रसवत असतात आणि त्यातून दर्जेदार साहित्य निर्मिती होत असते. असाच एक आगळावेगळा प्रयत्न मूळ तिवसा येथील लेखक प्रा. महादेव लुले ऊर्फ देवबाबू यांच्या समीक्षणातून साकार झालेल्या व अखिल भारतीय वऱहाडी साहित्य मंच या पूर्ण महाराष्ट्रात वऱहाडी जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या साहित्य संस्थेद्वारे प्रकाशित ‘रई’ या वऱहाडी भाषेतील पहिल्या समीक्षणपर पुस्तकात दिसून येतो.

वऱहाडीतील नवोदितांसमवेत प्रथितयश वऱहाडी कवी-कवयित्रींच्या एपूण एकशे एक दर्जेदार वऱहाडी कवितांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. यामध्ये कवींनी संवेदनशील, समाजाभिमुख, शेतीविषयक, अनिष्ट प्रथांना विरोध अशा वेगवेगळ्या विषयांच्या कवितांचे समीक्षण प्रा. देवबाबु यांनी केले आहे.

प्रत्येक कवीची रचना वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी वाटते. त्यामध्ये ‘आठोनीतलं लानपन’ ग्रामीण संस्पृती आणि बालपणातील अनुभवाचे दर्शन घडवणारी कवी उज्ज्वल विभुते यांच्या कवितेच्या ओळी मनाला त्या काळात घेऊन जातात-

वडाच्या पारंब्या, निंबाचे झोके
आंब्यावरची डाबडुबली तृप्तीचे मोके
जात्यावरली गाणी, मीसयची दाय,
पाटाचं पाणी अन् गोठायातली गाय

कवी रवींद्र महल्ले यांची ‘पोशिंदा’ कविता शेतकऱयाचं जिवंत चित्रण डोळ्यांसमोर रेखाटते. या काव्यसंग्रहातील बहुतांशी कवी ग्रामीण भागातील पार्श्वभूमी लाभलेले असल्याने ग्रामीण संस्पृती आणि इथल्या मातीशी जुळलेली लिखाणाची नाळ प्रत्येक कवितेतून जाणवते व त्यातून वाचक सुखावतो. कवी पुष्पराज गावंडे ‘संसार’ कवितेत फार सुंदर लिहितात

तुले काय आता बाई, देणं घेणं सजन्यासंग
तुया साज रानातल्या, काया मातीसंगं

ज्येष्ठ साहित्यिक शिवलिंग काटेकर आपल्या कवितेतून पावसाला आर्त हाक देतात तर कवी रवींद्र दळवी ‘वळसाईत्री’ या कवितेतून या संपूर्ण स्त्राr जातीला आधुनिकतेचा स्वीकार करण्याचा सल्ला देतात. ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले आणि कवी नीलेश कवडे आपल्या कवितेत माहेरवाशीण मुलीचे भाव अगदी तरल पद्धतीने रेखाटतात. कवयित्री विना डिक्कर यांची मायबोली वऱहाडीची कविता वऱहाडीचा गोडवा ओठावर ठेवून जाते. कवयित्री साधना काळबेंडे ‘आठोनीतली माय’ या कवितेने आई सोडून गेल्यावर होणाऱया वेदनांनी डोळे पाणावतात.

कवी उमेश थोरात गावापासून दूर असणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या मनातील गावाविषयीची ओढ व्यक्त करतात. कवी अजय राऊत आणि कवयित्री निलू मानकर यांच्या कविता नदीचे सौंदर्य रेखाटत तिचे आणि आपले नाते फार सहज रीतीने उलगडतात. कवयित्री अनुराधा धामोडे यांची ‘बाप’ कविता कोकणात राहूनसुद्धा वऱहाडी बोली विषयीवर कवयित्रीची पकड आणि बापाच्या भावना व्यक्त करते. शिवकवी ईश्वर मते यांची कविता वाचून छत्रपती शिवरायांचे स्वराज्य डोळ्यांसमोर उभे राहते. कवी प्रा. संजय कावरे तर आपल्या ‘जसं होईन तसं’ या कवितेतून शेतकऱयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.

कवी अंकुश इंगळे यांची कार्यकर्ता ही कविता तर आजच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते. कवी नीलेश देवकर यांच्या कवितेतून शेतकऱयाच्या जीवनातील वनवास डोळ्यासमोर उभा राहतो.

कविता नेमकी सुचते तरी कशी याचे उत्तर कवी अरविंद शिंगाडे यांची कविता आणि देवबाबू यांचे समीक्षण वाचल्यावर वाचकास मिळते आणि ‘रई’मधील सर्व कविता या फक्त सुचलेल्या नसून त्या सोसलेल्या अनुभवातून आल्याचा प्रत्यय वाचकाला येतो. अशाच अजय माटे यांची ‘माय’, अजय इंगळे यांची ‘भूक’ कविता मनाला पाझर पह्डतात. ‘उलंगवाडी’ कवितेत एका संवेदनशील कवीची भेट होते ते म्हणजे कवी नितीन वरणकार. ते लिहितात-

उलंगवाडी उलंगवाडी झाली वावराची आता
सारं आभाय रुसलं करू कोणासंगं बाता

ओसाड पडलेले रान पाहून कवीचा जीव कासावीस होतो. लगेच ‘वखरवाई’ पूर्ण शेत डोळ्यांसमोर उभं करते. अशा विदर्भातील एकापेक्षा एक सरस दर्जेदार साहित्यिकांच्या रचनांचे समीक्षण देवबाबू यांनी आपल्या खास रसाळ शैलीत केले आहे.

त्यामध्ये कवी विजय ढाले यांची ‘नभाचा आहेर’, कवयित्री रजनी बावस्कर यांची ‘वाट पाहते हरणी’ , कवयित्री विद्या बनाफर यांची ‘माय सुमार लळली’ कवयित्री अलका बोर्डे यांची ‘विदर्भ उवाच’ कवी अमोल गोंडचवर यांची ‘वरीस’ कवी विजय पळसपगार यांची ‘औंदाची दिवाई’, कवयित्री डॉ. मीना सोसे यांची ‘गाठ हाय माह्याशी’ यांच्यासह विदर्भातील एपूण एकशे एक कविता दर्जेदार आणि तितक्याच ताकदीचे देवबाबू यांनी केलेले समीक्षण आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास प्रत्येक साहित्यिकाने एकवेळ ‘रई’ वाचावी आणि तिच्या प्रेमात पडावं एवढा सुंदर हा समीक्षण ग्रंथ तयार झाला आहे.

रई
प्रकाशन – अखिल भारतीय वऱहाडी साहित्य मंच, अकोला
मूल्य – 250 रुपये