
स्टॉक मार्केटमध्ये काम सुरू करताना तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असावे लागते. कोणत्याही अधिकृत ब्रोकरकडे पॅनकार्ड, आधारकार्ड ही सरकारतर्फे इश्यू केलेली कागदपत्रे, फोटो, बँक डिटेल्स, जर तुम्ही एनआरआय असाल तर त्याचे पुरावे सबमिट करून अकाउंट सुरू करता येते. आज ब्रोकर्समधल्या स्पर्धेमुळे ग्राहकांसाठी चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुमची बँक आणि तुमचा ब्रोकर यांना लिंक केलेले असते. त्यामुळे आपले पैसे आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करुन त्या पैशाचे शेअर्स विकत घेता येतात किंवा डिमॅट अकाऊंटमध्ये असलेले शेअर्स विकून आलेले पैसे बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. आपण शेअर्सची खरेदी विक्री आपल्या कॉम्प्युटरद्वारे किंवा मोबाईलमधून किंवा ब्रोकरने नेमलेल्या डीलरद्वारे फोनवरूनही करू शकतो. शेअर्सच्या खरेदीविक्रीनंतर आपल्या मोबाईल आणि ईमेलवर त्याची माहिती मिळते. त्या अर्थाने इथे 100 टक्के पारदर्शकता असते.
आपण कोणता शेअर, कोणत्या प्राईसला किंवा किती संख्येने खरेदी करावा, त्याचप्रमाणे कोणता शेअर कधी विकत घ्यावा किंवा कधी विकावा याचा निर्णय आपलाच असतो. त्यामुळे शेअर्स खरेदी विक्रीतून झालेल्या नफ्यातोटय़ाला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार विचारपूर्वक करावेत अशा सूचना सेबी कायम करीत असते. जोखीम आहे तरीही अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराला महत्त्वाचे स्थान आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे.
आपण विमानातून, बस किंवा कारने किंवा जहाजातून प्रवास करताना प्रत्येक ठिकाणी अपघाताची भीती असतेच. हवामानातील बदल, रस्त्यावरचे खड्डे आणि समुद्रातील वादळं आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात. हे आपल्याला माहीत आहे. आपला प्रवास आपल्या जबाबदारीवर करावा असे सतत कानावर आले तर किती लोक प्रवास करतील? मार्पेटमधली गुंतवणूक ही जोखमीची असते. पण ते सतत ऐकवल्यामुळे नकळत मनात भीतीचा थर साचतो. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण तिच्या परिणामांसकट आपल्याला माहीत असेल. आपल्याच मनात आपण भीतीला मानाचे स्थान दिल्यामुळे तो ब्रह्मराक्षस आपली पाठ सोडत नाही आणि संधी मिळेल तेव्हा तो आपल्याला पाडत राहतो.
– प्रवीण धोपट, (लेखक दिपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)
इच्छा आणि कृती यामध्ये जमीन आसमानचे अंतर असते. स्टॉक मार्पेटसंबंधी मनात असलेले प्रश्न, स्टॉक मार्पेटविषयी मित्र नातेवाईकांना आलेले अनुभव, हातात असलेला वेळ, पैसे, ज्ञान आणि साधने, स्टॉक मार्केटविषयी असलेले समज- गैरसमज या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून शंभरातल्या एकाची स्टॉक मार्पेटमध्ये सुरुवात होते. जर तुम्ही त्या शंभरातले एक असाल तर आजच सुरुवात करा…
























































