सारांश- परिवर्तनाची ओढ; पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. शुभांगी कुलकर्णी

देशाचा गतवर्षीचा वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार मुलांपेक्षा मुलींमध्ये 12 वीनंतरचे शिक्षण सुरू ठेवण्याबाबतची इच्छा अधिक प्रमाणात असल्याचे एक आशादायक चित्र समोर आले आहे. शिक्षणामुळे उत्कृष्ट गृहिणी बनण्यासाठी आपण सक्षम होऊ, तसेच स्वतला कसे सिद्ध करावे, समाजाकडून सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी काय करायला हवे याबाबतचे ज्ञान आपल्याला शिक्षणातून मिळते, असे मत या सर्वेक्षणातील मुलींनी व्यक्त केले. मुलींमधील शिक्षणाविषयीची जागरुकता परिवर्तनशील म्हणायला हवी.

‘देशाची वार्षिक शिक्षण स्थिती-2023’च्या अहवालात मुलांच्या तुलनेत मुली बारावीनंतरचे शिक्षण सुरू ठेवण्याबाबत अधिक आग्रही असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून मुलींना शिक्षण घेण्याची आवड असल्याचे लक्षात येते. हा अहवा एका सर्वेक्षणाच्या आधारावर असून मुलींमध्ये अभ्यासाची आवड असण्याबरोबरच शिक्षण घेण्यामागचे आणखी एक कारण सांगितले आणि ते म्हणजे उत्तम गृहिणी होण्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याचा विश्वास.

साधारणपणे मुले शिक्षण सुरू ठेवण्याबाबत उत्साही नसतील किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास तयार नसतील तर कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱयांमुळे त्यांच्यावर दडपण असल्याचे गृहित धरले जाते. प्रसंगी ते आपल्या कुटुंबाला, पालकांना विश्वासात न घेताही शिक्षण सोडू शकतात, पण मुलींना अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार फारसा नसतो किंवा त्यांच्या हातात काही नसते. मुलींकडून घेतले जाणारे निर्णय हे व्यक्तिगत नसतात, तर ते कुटुंबाच्या स्थितीवर अवलंबून असतात.

पदवीपर्यंतचे शिक्षण 

‘एएसईआर-2023’ सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार मुलींच्या तुलनेत मुलांचा एक मोठा वर्ग बारावीनंतर शिक्षण घेण्यास फारसा उत्सुक नसतो. या वेळी मुलींनी मात्र किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलांनी बारावीनंतर तत्काळ शिक्षण सोडून देण्याच्या शक्यतेवर चर्चा केली.

सामाजिक निकषांत बदल 

मुलींच्या विवाहयोग्य वयासंदर्भातील सामाजिक निकषांत झालेला बदल हे तरुण महिलांना भविष्यात उच्च शिक्षण घेण्याची क्षमता विकसित करण्याचे मोठे कारण बनले आहे. 21 ते 22 वयाचे होईपर्यंत शिक्षण घेण्यासाठी वेळ कसा मिळेल, याबाबत बहुतांश मुलीं जागरुक असल्याचे  जाणवले. विवाहाचे वय पुढे ढकलल्याने उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेण्यासाठी या मुलींना सामाजिक रूपाने प्रशस्त मार्ग उपलब्ध करून दिला. मात्र पुढील शिक्षण हे कदाचित नोकरीच्या बाजारात चांगली तयारीसाठीदेखील असू शकते.

कारणे काय?

बहुतांश मुली सािढय रूपाने शिक्षण सुरू ठेवण्याबाबत का सजग असतात? अहवालात म्हटले आहे, की मुलींशी चर्चा करताना दोन कारणे समोर आली. पहिले म्हणजे शिक्षण हे त्यांना चांगली गृहिणी होण्यासाठी सक्षम करू शकते. शिक्षणापासून मिळणाऱया फायद्याबाबत सीतापूरला  दहावीत शिकणाऱया एका मुलीने सांगितले की, घराचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे आम्ही शिक्षणातून शिकू शकतो. दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीशी कसे बोलायचे, स्वत:चे सादरीकरण कसे करायचे आणि जवळच्या लोकांचा सन्मान कसा करायचा हेदेखील शिक्षणातून कळू शकते. वास्तविकपणे अधिक शिक्षण घेतल्यामुळे अशा प्रकारचे परिणाम कधी दिसतील हे मात्र सांगता येत नाही. लहान मुलांत नैतिक मूल्ये रुजविण्याबरोबरच सौंदर्य किंवा शिवणकामासारखा व्यावसायिक अभ्यापाम घेत भविष्यात वाटचाल करताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे आणि काही उत्पन्न मिळवणे यांसारख्या गोष्टींची शक्यतादेखील मुलींच्या विचारात दडलेली होती. अहवालाच्या मते, शिक्षण घेण्यासंदर्भात  आणखी एक सोपे कारण म्हणजे त्यांना शाळेत जाण्याची आवड असणे. शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्याने त्यांना दैनंदिन धावपळीतून दिलासा मिळतो, असे काही मुलींचे म्हणणे आहे. मग घरातील कामामुळे अभ्यासासाठी वेळ कमी मिळत असला तरी ते शिक्षणाबाबत हट्टी दिसतात. (उदा. अभ्यास आणि घरातील काम यात ताळमेळ बसवताना मुलींच्या हाताशी वेळ राहत नाही. मग घरातील कामे आटोपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करावा लागतो किंवा घरातील कामकाजांमुळे कमी वेळ मिळत नसल्याने रात्री उशीरा अभ्यास करावा ाागतो) तसेच अनेकांना शाळेत जायला आवडते, कारण त्यांना कौटुंबिक जबाबदाऱयांपासून काही प्रमाणात मुक्ती मिळवता येते.

मुलांना बारावीपर्यंतचेच शिक्षण आवडते 

याउलट ‘एएसईआर’ सर्वेक्षणातून एक गोष्ट निदर्शनास येते की मुलींच्या तुलनेत मुलांना बारावीपर्यंतचेच शिक्षण घेण्यास अधिक आवडते. अनेक मुलांनी लवकर पैसे कमावण्याची इच्छा प्रकर्षाने व्यक्त केली. ते म्हणतात, या वयात कितीतरी मुले शाळेत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करतात. कुटुंबासमोर आर्थिक अडचण असेल किंवा त्यांच्या बहिणींना शुल्काच्या कारणावरून शाळेतून काढून टाकले असेल तर अशा वेळी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय राहात नाही. जर शिक्षण सुरू ठेवायचे असेल तर त्यांना उत्पन्नाचा स्रोत शोधण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अर्थात मुली आणि मुलांच्या चर्चेदरम्यान त्यांच्या इच्छा, प्राधान्पामात स्पष्टता दिसून आली. मात्र गुणात्मक डेटा पाहिल्यास तरुणांना पुढचा मार्ग निवडताना स्वत:चा निर्णय महत्त्वाचा वाटतो. अशा वेळी लिंग भेदाभेद कळते. साधारणपणे मुलांना पुढचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते अशा वेळी कुटुंबाचा विचार न करताही निर्णय घेऊ शकतात. मुलींच्या बाबतीत शिक्षण सुरू ठेवायचे किंवा थांबवायचे याबाबतचा निर्णय त्यांच्या हातात नसतो, असे अहवालात म्हटले आहे.

बियाँड बेसिस सर्वेक्षण

‘एएसईआर-2023  बियाँड बेसिस सर्वेक्षण’ 26 राज्यांतील 28 जिह्यांत करण्यात आले आणि त्यात 14 ते 18 वयोगटातील एकूण 34,745 मुलांचा समावेश करण्यात आला. उत्तर प्रदेश अणि मध्य प्रदेशमध्ये ग्रामीण भागातील दोन जिह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिवाय प्रत्येक प्रमुख राज्यात एका ग्रामीण जिह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. ‘एएसईआर’ हे एक देशव्यापी देशांतर्गत सर्वेक्षण असून ते ग्रामीण भागातील मुलांचे शालेय शिक्षण अणि शिकण्याच्या स्थितीचे आकलन करते. बेसिक ‘एएसईआर सर्वेक्षण’ हे 3 ते 16 वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या बालवाडी आणि शाळेतील प्रवेशाची माहिती देते. ‘एएसईआर’ सर्वेक्षण हे ग्रामीण हिंदुस्थानातील मुलांत शालेय शिक्षण आणि शिकण्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे.