
>> स्वरा सावंत
ऑस्कर, लिली, रोनाल्डो, खारी, चार्ली, डुग्गू अशी नावं हल्ली घराघरांतून कानावर पडत आहेत. ही कोणी तुमच्या आमच्यासारखी माणसं नसली तरी प्रत्येक घरात असणारं पेट पुराण घरातली महत्त्वाची जागा घेऊ पाहतंय. मग या घरच्या सदस्यांचे नखरेदेखील पुरवायला हवेत. घरातल्या कार्यक्रमांपासून ते अगदी सणावारांत मिरवायला अनेक ट्रेण्डी ऑप्शन माय आर्ट बकेटच्या निना आणि सुशांतने आणले आहेत. पेट पॅरेंटींगमधला हा धमाका अत्यंत कौतुकास्पद असून या सदस्यांच्या प्रेमात पाडणारा आहे.
लॉकडाऊनमधल्या आरामाने अनेक मेंदूंना कामाला लावले. त्यात निना शिंदे आणि सुशांत देवरुखकर यांचे नाव अग्रगण्य आहे. माय आर्ट बकेटचा शोध त्यांना लागला आणि पेट पॅरेंटींग करणाऱया परिवारांना एक आनंददायी उभारी मिळाली. www.myartbucket.com या वेबसाईटवरून सुरू झालेला हा ट्रेण्डी साज आज सातासमुद्रापार पोहोचला आहे. आपल्या घरात असलेल्या श्वानासाठी अत्यंत इन फॅशन अॅक्सेसरीज, कपडे, बो या वेबसाईटवरून घेता येतील. यामध्ये बो, बंडाना, टी-शर्ट, फ्रॉक, जॅकेट्स, हेअरबॅण्ड, क्लीपचा समावेश आहे. लग्नकार्य, सणावारांसाठी परकरपोलक, नववारी, शेरवानीचा ऑप्शन आहे, तर आर्टबकेटवरून समर कलेक्शन, विंटर कलेक्शन, रेनकोटचे पर्यायही उपलब्ध आहेत.
यूएसमधून या कपडय़ांना मोठी मागणी आहे, तर हिंदुस्थानात चेन्नई आणि मुंबईतून मोठा प्रतिसाद या कन्सेप्टला मिळाला आहे. अगदी 200 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत या पेट प्रंsैडली वस्तू विकत घेता येतील. इन्स्टाग्राम, फेसबुकवरून सुरू झालेला हा प्रवास आता अन्य शॉपिंग साईटवरही जोरदार सुरू आहे. मूळचे चिपळूण आणि राजापूरातून असलेल्या या कपलने पेट फॅशनला एक नवा आयाम दिला आहे.
लाडक्या श्वानांसाठी खास कलेक्शन
- लॉकडाऊनमध्ये डेव्हलप झालेल्या या कन्सेप्टला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ठाण्यातील बदलापूर येथे वर्कशॉप असून प्रामुख्याने गरीब स्त्र्ायांना आर्थिक हातभार देण्यासाठी आम्ही हे काम त्यांच्याकडून करून घेत आहोत. यासोबतच घरच्या या स्पेशल सदस्याच्या आयुष्यात आनंद भरण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सुशांत देवरुखकर, निना शिंदे यांनी सांगितले.




























































