लेख – कोरोना आणि ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ची भूमिका!

663

>> डी. डी. काळे

हिंदुस्थानात 30 जानेवारी 2020 रोजी कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्याची सुरुवात चीनमधून झाली. 16 मार्च 2020 पर्यंत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे हिंदुस्थानात एकूण 150 पेक्षा जास्त रुग्ण आणि 2 मृत्यू झाल्याचे निश्चित केले आहे.

कोविड-19 वर उपचार करण्यासाठी आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठीच्या एसयूपी (सिंगल यूज प्लॅस्टिक) साधनांची हिंदुस्थानात प्रचंड मागणी आहे. कोविड-19 या संसर्गजन्य आजाराशी लढा देण्याचे महत्त्व लक्षात घेत सरकारने त्याचा पुरवठा केला पाहिजे.

चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूची (COVID-19) साथ जगात सर्वदूर पसरली आहे. सार्वजनिक आरोग्यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेलाही या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बातमीनुसार कोरोना व्हायरसमुळे (COVID-19) फेब्रुवारी महिन्यात जागतिक पातळीवरील निर्यातीला 50 अब्ज अमेरिकन डॉलरचा फटका बसला आहे.

चीन हा अनेक उत्पादनांचा आणि रासायनिक उद्योगापासून ते डिजिटल कॅमेऱयांमधील आणि कार क्षेत्रातील सुटय़ा भागांचा म्हणजेच कथित इंटरमीडिएट (मध्यस्थ) उत्पादनांचा पुरवठादार राहिला आहे, पण तेथील पुरवठा साखळ्यांवर दीर्घकालीन परिणाम झाल्यामुळे जगभरातील सर्व कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची भीती वाटू लागली आहे.

हिंदुस्थानात 30 जानेवारी 2020 रोजी कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्याची सुरुवात चीनमधून झाली. 16 मार्च 2020 पर्यंत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे हिंदुस्थानात एकूण 150 पेक्षा जास्त रुग्ण आणि 2 मृत्यू झाल्याचे निश्चित केले आहे.

कोविड-19 वर उपचार करण्यासाठी आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठीच्या एसयूपी (सिंगल यूज प्लॅस्टिक) साधनांची हिंदुस्थानात प्रचंड मागणी आहे. कोविड-19 या संसर्गजन्य आजाराशी लढा देण्याचे महत्त्व लक्षात घेत सरकारने त्याचा पुरवठा केला पाहिजे आणि त्याचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी सरकार सज्ज होत आहे. एका माणसापासून दुसऱया माणसाला संसर्ग होण्यापासून डिस्पोझेबल मास्क, ग्लोव्हज्, गाउैन्स, गॉगल्स इत्यादी साधने संरक्षक असल्याचे सिद्ध होत आहे.

वैयक्तिक संरक्षणाची साधने

अनेक माध्यमांतील अहवालानुसार चीनने आणीबाणीसाठी सेंट्रल मेडिकल रिझर्व्हमधून लाखोंच्या संख्येने सिंगल यूज डिस्पोजेबल मास्क्स, संरक्षक पेहेराव, गॉगल्स आणि ग्लोव्हज् वुहानमध्ये मागविले आहेत.

डब्ल्यूएचओ आणि यूएन एजन्सींनुसार कोविड-19 चे निर्मूलन होईपर्यंत या आजाराशी लढा देण्यासाठी दर महिन्याला 8 कोटी 90 लाख वैद्यकीय मास्क, 7 कोटी 60 लाख चाचणी ग्लोव्हज् आणि 16 लाख गॉगल्सची आवश्यकता भासणार आहे. या रोगाचा संसर्ग झालेल्या 47 देशांमध्ये डब्ल्यूएचओतर्फे 5 लाख संरक्षक उपकरणे पाठविण्यात आली आहेत, परंतु हा साठा झपाटय़ाने संपत चालला आहे.

वैयक्तिक संरक्षण साधनांचा तुटवडा

आश्चर्य वाटेल, पण ही वैयक्तिक संरक्षक साधने अत्यंत कलंकित आणि एकदाच वापरण्याजोग्या म्हणजेच सिंगल यूज प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेली आहेत. या साधनांची आता व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी लागेल आणि ती अत्यंत उच्च तापमानात जाळावी लागतील, जेणेकरून हा विषाणू पसरणार नाही.

अनेक दशकांपासून प्लॅस्टिक हे असे एकमेव मटेरियल आहे, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुविधाजनक आणि व्यावहारिक सिद्ध झाले आहे आणि पुन्हा एकदा या विषाणूला आळा घालण्यासाठी आणि अनेक मानवी जीव वाचविण्यासाठी याच मटेरियलचा उपयोग होत आहे.

प्लॅस्टिकशिवाय आधुनिक आरोग्य सेवाक्षेत्राचा विचारही केला जाऊ शकत नाही साध्या डिस्पोझेबल सीरिंजपासून ते अत्याधुनिक एमआरआय स्कॅनरच्या भागांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिक असते. मास्क, टोप्या आणि गाऊन यासारखे संरक्षक पेहराव ‘नॉन वोव्हन पॉलिऑलेफिनिक’ म्हणजेच ‘पॉलिप्रोपिलिन’ मटेरियलपासून तयार करण्यात येतात. संसर्गजन्य आजारांचा फैलाव झालेला असताना आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यक्तींकडून हे पेहराव वापरण्यात येतात आणि संसर्गाचा धोका कमी करण्यात येतो. कारण हे पेहराव काचत नाहीत, मऊ असतात, जिवाणूंचा आणि विषाणूंचा संसर्ग टाळता येतो आणि त्यांच्यात उत्तम संरक्षक गुणधर्म असतात. ही साधने एकदा वापरण्याच्या दृष्टीनेच तयार करण्यात आली आहेत.

पॉलिकार्बोनेट राळेपासून पासून तयार केलेले गॉगल्स कोरोना विषाणू हाताळताना हॉस्पिटलमध्ये खूपच उपयोगी पडले. पॉलिकार्बोनेट लेन्सेस आघात पचवू शकतात आणि मजबूत असतात. त्याचप्रमाणे ते काचेपेक्षा हलके असतात. बऱयाच कालावधीसाठी घालण्यासाठी या लेन्सेस अधिक आरामदायी असतात. कारण अतिनील किरणांना हे लेन्सेस 100 टक्के ब्लॉक करतात’’ असे ते म्हणाले.

आयव्ही बॅग्ज आणि टय़ुबिंग, आयव्ही कॅन्युला आणि आयव्हीमधील द्रव इन्फ्यूज (शरीरात सोडण्याची क्रिया) करण्यासाठीच्या डिस्पोझेबल सीरिंज वैद्यकीय दर्जाच्या प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या असतात, जेणेकरून रक्तप्रवाहात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये. सर्वसामान्यपणे वापरण्यात येणाऱया आयव्ही बॅग्ज आणि इन्फ्युजन सेट्स पॉलिव्हिनाईल क्लोराईडपासून (पीव्हीसी) तयार करण्यात येतात. एथिलिन कोपॉलिमर्सचा वापर करून तयार केलेली काही नॉन-पीव्हीसी उत्पादने असतात. या उत्पादनांमध्ये अधिक चांगले वैद्यकीय गुणधर्म असतात, पण तेसुद्धा प्लॅस्टिकच असतात. बॉडी आणि प्लंजर पॉलिप्रॉपिलिनपासून तयार केलेले असतात आणि प्लंजरवरील सील पॉलिआयसोप्रिन रबरपासून तयार केलेले असते. आजच्या घडीला डिस्पोझेबल प्लॅस्टिक सीरिंजऐवजी पर्यायी उत्पादने वापरण्यात येत आहेत.

कापडी ऍप्रन्स आणि सुट्स यासारख्या पारंपरिक मटेरियल्सच्या बाबतीत प्रत्येक वापरानंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी वेळ आणि स्रोत खर्ची पडतात. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरण चुकीच्या पद्धतीने होण्याची जोखीम असते. परिणामी रोगाचा अधिक प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता वाढते.

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सरकार आणि नियामक मंडळांनी योग्य प्रकारे कचऱयाची विल्हेवाट आणि रिसायकलिंग यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध घालू शकतो आणि कोविड-19 सारख्या परिस्थितीला आळा घालू शकतो. रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंची जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त यंत्रणेच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोरोना विषाणूशी अधिक परिणामकारकपणे लढा देता येईल.

(लेखक पॉलिमर टेक्नॉलॉजीतील तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या