मुद्दा – मराठी भाषा आणि मराठी माणूस

731
marathi-school

>> विजय ना. कदम

ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा करताना ‘मराठी भाषा आणि संस्कृतीविषयीचा जिव्हाळ्याचा झरा आटू न देणे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कामकाज मराठी भाषेतच करावे असे अधिकारी व मंत्र्यांना सांगितले आहे. महाराष्ट्रात असणाऱया केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये कामकाज मराठी देवनागरी लिपीत असावे. जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार मराठीत असावेत. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाची भाषा मराठीत असावी. शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना याबाबतचा काथ्याकूट करण्यापेक्षा सध्याच्या समाज माध्यमांच्या युगात इतर भाषांतील प्रचलित शब्द घेऊन प्रथम मराठी भाषेला अग्रस्थान द्यायला हवे. जनतेने प्रथम बँक धनादेश, विमा कंपन्या, शेअर्स, पोस्ट, म्युच्युअल फंड, गुंतवणुकीचे व्यवहार, सरकारी निमसरकारी, खासगी करारनामे, कागद पत्रे इत्यादींसाठी मराठीचा आग्रह धरावा आणि देवनागरीमध्ये सहय़ा कराव्यात. इमारती, संकुलात राहणाऱया मराठी माणसांनी संकुल प्रवेशद्वार, तसेच घराच्या दारांवरील, दुकानांवरील पाटय़ा मराठीमध्ये लिहावयास हव्यात. निरनिराळ्या आस्थापनांमध्ये, कार्यालयांमध्ये, इमारतीच्या प्रवेशद्वारांमध्ये नोंदवहीत नाव, वेळ भ्रमणध्वनी क्र. मराठीमध्ये लिहावा. प्रवास करताना मॉल, दुकानांत एवढेच नव्हे तर फेरीवाल्यांकडे खरेदी करताना मराठीत बोलावयास हवे. कार्यालयांत, पक्ष संघटना कार्यालयांत कामानिमित्त आलेल्या नागरिकांशी मराठीचा आग्रह धरावयास हवा. त्यामुळे परप्रांतीयही मराठीत बोलण्यासाठी प्रवृत्त होतील. जास्तीत जास्त ठिकाणी मराठीत बोलणे, व्यवहार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मराठी वाहिन्यांवरील इंग्रजी शब्द उदाहरणार्थ, लाईव्हला प्रत्यक्ष, ब्रेकिंग न्यूजला ठळक बातम्या, ब्रेकला विश्रांती, अँकरला सूत्रधार इत्यादी. 21 वे शतक हे माहिती युगाचे, संगणक इंटरनेटचे आहे. गुगलच्या मोहजाळात, जबाबदारी व जाणीव जागृतीने सामाजिक संदर्भ व बदलत्या परिस्थितीचे वास्तव्याचे भान ठेवून मराठीला अभिजात भाषेचा सन्मान द्यायचा आहे. अभिमानाने मराठी भाषा समृद्ध भाषा करूया.

आपली प्रतिक्रिया द्या