
दुर्गेश आखाडे
लॉकडाऊनचा काळ सुरू होता. महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. आदित्यच्या घरात साधा मोबाईल होता. अॅण्ड्रॉईड मोबाईल त्याने फक्त इतरांच्याच हातात पाहिला होता. आपल्या हातात असा मोबाईल कधी येईल याची त्याला प्रतीक्षाच होती. ऑनलाइन शिक्षणामुळे अखेर आदित्यच्या वडिलांना आदित्यसाठी स्मार्ट पह्न घ्यावा लागला. हा फोन हातात मिळताच आदित्यची भटकंती सुरू झाली. मोबाईलवर तो धडाधड फोटो काढू लागला. त्याची पह्टो काढण्याची हौस भागत नव्हती. मोबाईलवर एका मिनिटात तब्बल 163 फोटो काढत आदित्यने वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम केला. पावस गावामध्ये राहणारा आदित्य भट हा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिकत आहे. स्मार्ट फोन हातात मिळाल्यानंतर त्याला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. चांगल्या मोठय़ा कॅमेऱ्याने फोटो काढावेत असे फोटो तो मोबाईलवर काढू लागला. मोबाईल घेऊन तो जंगलात हिंडू लागला, पानं, फुलं, पक्षी, प्राणी यांची तो फोटोग्राफी करू लागला. सुरुवातीला फोटो काढून तो फेसबुकवर टाकत होता. तिथे त्याला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर रत्नागिरीतील लेन्स आर्ट या संस्थेशी तो जोडला गेला. रत्नागिरीतील काही छायाचित्रकारांनी त्याला फोटोग्राफीबाबत मार्गदर्शन करताना फोटोग्राफीसाठी विविध विषय सुचवले आणि तसेच फोटो तो आपल्या मोबाईल कॅमेऱयात कैद करू लागला. आपण एका मिनिटात किती फोटो काढू शकतो हे तो अभ्यासू लागला. एका मिनिटात किती फोटो काढले जाऊ शकतात, कोणी असा विक्रम केला आहे का, याचा तो इंटरनेटवर शोध घेऊ लागला. वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याला अशा प्रकारच्या विक्रमांची माहिती मिळाली. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने एका मिनिटात 90 फोटो काढले होते. आपण मोबाईलवर त्याहून अधिक पह्टो काढू शकतो याचा आत्मविश्वास आदित्यमध्ये असल्याने त्याने त्या संस्थेकडे संपर्क केला. संस्थेची माणसे स्वतः गावात दाखल झाली. त्यांनी ‘‘तुला आवडेल ती जागा निवड आणि तिथे तू आम्हाला एका मिनिटात पह्टो काढून दाखव’’ असे सांगितले. आदित्य पह्टो काढत असताना त्याचे संपूर्ण चित्रीकरण केले गेले. आदित्यने गावातील एक जागा निवडली आणि त्या ठिकाणी एका मिनिटात तब्बल 163 पह्टो काढले. मोबाईलवर एका मिनिटात इतके पह्टो काढणे हा एक विक्रमच होता. त्याच्या विक्रमाची नोंद वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली.
आदित्यने मायक्रो पह्टोग्राफी केली आहे. त्यासाठी त्याने काही लेन्स विकत घेतल्या. त्या लेन्सच्या सहाय्याने त्याने छोटे कीटक, मुंग्या यांची अफलातून पह्टोग्राफी केली आहे. त्याने जंगलात फिरणाऱया अनेक सापांचे, 100 फुलपाखरांचे, भिंगरीचे पह्टो काढले आहेत. पानांचे जीवनचक्र सांगणारा उत्तम पह्टो त्याने काढला. त्याच्या घराजवळ एक फणसाचं झाड पडलं होतं. त्या झाडाची काही पानं सुकली होती. काही पाने ताजी होती. ही सर्व पाने काढून त्याने एक पानाचे जीवनचक्र तयार केलं. त्याचा पह्टो काढला. हा पह्टो पंपास या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाला. त्याला एक दशलक्षपेक्षा अधिक लाइक मिळाले. आदित्यने पह्टो स्टुडिओ हा उपक्रमही सुरू केला आहे. पह्टोतून स्टोरी मांडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सूर्यकिरणांपासून मिळणाऱया सावलीचा उपयोग करून तो पह्टोस्टोरी तयार करतो. सूर्य चोरून नेणे, सूर्य पंदिलात टाकून घेऊन जाणे, युद्ध सुरू असताना सूर्य समोरच्या व्यक्तीच्या अंगावर फेकणे अशी अफलातून पह्टोग्राफी त्याने केली आहे. आदित्यला एका स्पर्धेमध्ये निकॉन डी हा पॅमेराही बक्षीस मिळाला, मात्र आजही आदित्य मोबाईलनेच पह्टोग्राफी करतो. मोबाईल पह्टोग्राफीतच त्याला आनंद मिळतो, असे तो सांगतो.
























































