
>> दिलीप जोशी
नोव्हेंबर महिन्यातल्या एका लेखात आपण 1974मध्ये ‘शौरी’ तारका समुहाच्या दिशेने एक ‘रेडिओ’ संदेश पाठवला आहे त्याविषयीची माहिती घेतली होती. हा संदेश अमेरिकेच्या प्युटोरिको या बेटावरील महाकाय ‘ऑरिसीबो’ रेडिओ दुर्बिणीद्वारे पाठवण्यात आला होता. त्याबाबतची धक्कादायक गोष्ट म्हणजे 1 डिसेंबरला ती दुर्बिण कोसळण्याचं वृत्त आलं. कदाचित टीव्हीवर तुम्ही ते पाहिलंही असेल.
प्युटोरिको हे बेट ज्या भागाला ‘बर्म्युडा ट्रनाल’ म्हटलं जातं त्याचं एक टोक आहे. मेक्सिकोजवळ म्हणजे दक्षिण अमेरिका खंडात ते असून तिथे ही जगद्विख्यात प्रभावी रेडिओ दुर्बिण 1963मध्ये उभारण्यात आली. त्यानंतर 63 वर्षे ती जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण म्हणून नावाजली होती. 2016मध्ये चीनने त्यापेक्षा मोठी रेडिओ दुर्बिण बांधण्याचा दावा केला. अरिसीबो येथील ही दुर्बिण 1000 फूट व्यासाची एका नैसर्गिक दरीत बांधलेली अभिनव रेडिओ दुर्बिण होती. साधारण 1ऑ2 मीटर आकाराच्या 38700 पट्टय़ा (चॅनल) त्यावर बसवल्या होत्या. त्याला स्टीलचा मजबूत जाळीचा (मेश) आधार होता. मध्यभागी 150 मीटर उंचीवर 18 केबलनी स्थिर केलेला 2380 मेगाहर्ट्झ क्षमतेचा रिसिव्हर (संदेश ग्राहक) होता. 1960 ते 63 या काळात हे अवाढव्य बांधकाम पूर्ण झालं. आम्ही ‘खगोल’चा अभ्यास करायला लागल्यापासून म्हणजे 1985मध्ये दिसलेल्या ‘हॅली’ धूमकेतूपासून ते सर्व प्रकारच्या सूर्यग्रहणांचं ‘दर्शन’ नंतरच्या काळात हिंदुस्थानातून झालं. त्याचप्रमाणे अवकाश विज्ञानात झपाटय़ाने प्रगती होत गेल्याने तसेच त्वरित संदेश व्यवहाराने जग ‘जवळ’ आल्याने जगातील खगोल संशोधनही लगेच समजू लागले. याचा प्रभाव आमच्या सभासदांवर पडला. त्यामुळे प्रगत देशात जाण्याची संधी मिळालेल्या अनेकांनी तिथल्या खगोल संस्था आवर्जुन पाहिल्या. काहींनी तर ‘अॅस्ट्रॉनॉमी क्लब’चे सभासदत्वही घेतले. पण पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून ‘मॅजेलॅनिक क्लाऊड’ ही आपल्या आकाशगंगेची ‘उप’ किंवा ‘सॅटेलाईट’ गॅलॅक्सी पाहणारे मोजकेच होते. ऑरिसिबो प्रकल्प पाहण्याची संधी मात्र आमचे एक ज्येष्ठ सभासद सतीश डोईफोडे यांना मिळाली. त्या विशेष अनुभवावर आधारित आम्ही ‘खगोल वार्ता’चा खास अंकही प्रसिद्ध केला. ही गोष्ट 2005मधली. परवा ही दुर्बिण दुर्घटनाग्रस्त झाल्याचं वृत्त पाहिल्यावर डोईफोडे यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ते म्हणाले, ‘‘खरं तर पंपनीच्या कामासाठी मी प्युटोरिको येथे तीन महिन्यांसाठी गेलो होतो. दक्षिण अमेरिका खंडातलं हे बेट साधारण आपल्या मुंबईएवढं असेल. इथेच जगप्रसिद्ध रेडिओ टेलिस्कोप असल्याचं आधीच ठाऊक होतं. एका विक्टान्ट्रला तिथे जायचं ठरवलं. जीप घेऊन एकटाच चौकशी करत निघालो. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना त्याबद्दलची फारशी माहिती नव्हती. अरुंद रस्त्यावरून जीप चालवताना ‘जीपीटास’ मार्गदर्शन असल्याने रस्ता चुकण्याची धास्ती नव्हती… साधारण दोन तासांनी त्या महाकाय दुर्बिणीच्या आवारात दाखल झालो. या बेटावर स्पॅनिश वस्ती आहे. ती भाषा बोलणारा गार्ड आला. त्याने जीप पार्क करायला मदत केली. त्याला ‘ग्रासिअस’ म्हणून मी दुर्बिण पाहण्याचं तिकीट काढलं. परदेशात अशा प्रकल्पांची समग्र माहिती देणारा कार्यक्रमच असतो. प्रसिद्ध दुर्बिण असो वा ऑरिझोनातील ‘बॅरिंजर व्रेटर’. त्याचं जतन (आणि मार्पेटिंग) ते उत्तम प्रकारे करतात. आपल्याकडेही लोणार हे उत्तम जागतिक पर्यटनस्थळ व्हायला हवं.
सतीश सांगत होते, जेम्स बॉण्डच्या ‘गोल्डन आय’ चित्रपटात या दुर्बिणीचे चित्रण आहे. ही दुर्बिण हिरव्यागार जंगलातील एका दरीत अशा खुबीने उभारली आहे की वरून ती पाहताना आपण चकित होतो. 18 एकर जागेवर, 26 फुटबॉल मैदानांएवढय़ा जागेत ही पॅरॅबोलिक पद्धतीची आकाराची भव्य दुर्बिण पाहाताना 51 मीटर खोलीचा अंदाज आला. या दुर्बिणीकडे विश्वभरातून आलेले रेडिओ सिग्नल-273 तापमानाला थंड करून व ‘स्काय नॉहज’ फिक्टर झाल्यावर अभ्यासले जातात. विश्वातील दूरवरच्या क्वेझार व पत्सारचा अभ्यास त्याद्वारे होतो. आपल्याकडे नारायणगावजवळील ‘जायण्ट मीट वेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ असंच कार्य करतो… आता ऑरिसिबोचं कार्य आठवतं आणि तो टेलिस्कोप पाहिल्याचं समाधान वाटतं.
कुणाही खगोलप्रेमी व्यक्तीला या दुर्घटनेचं वाईटच वाटेल. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱयावर सातत्याने येणाऱया वादळांच्या (हरिकेन) फटका ‘ऑरिसिबो’ 2017मध्येही बसला होता. त्या वेळी त्यावरच 30 चॅनल बिघडल्याने 430 मेगाहर्ट्झ संदेश क्षमता क्षीण झाली. नंतर 2000मध्ये 4 नॅबर टॉवरची केबलच तुटली आणि आता 1 डिसेंबरला मोठाच उत्पात घडला. ऑरिसिबो दुर्बिण लवकर पूर्ववत होवो कारण तिथून पाठवलेल्या रेडिओ संदेशाला परग्रहावरील जीवसृष्टीकडून उत्तर आलं तर ते ‘ग्रहण’ करायला किंवा अन्य एखादा असाच संदेश टिपायला प्रभावी यंत्रणा हवीच.






























































