जगाच्या पाठीवर- पहिली शाळा

प्रेयसी लघाटे

जगातील पहिली शाळा 23 एप्रिल 1635 साली सुरू करण्यात आली. रेव्हरंड जॉन कोटन यांनी इंग्लंडमध्ये बोस्टन येथे ही शाळा सुरू केली. या शाळेत ग्रीक आणि लॅटिन या भाषा शिकवल्या जात. साधारण 200 वर्षांपूर्वी शिकवल्या जाणाऱया या शाळेची शिकवण्याची पद्धती आजच्यासारखीच होती. त्यापूर्वी प्राचीन हिंदुस्थानात आणि चीनमध्ये अशी विद्यापीठे होती. हिंदुस्थानात तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. लिहिण्याची सुरुवात इसवी सनापूर्वी 3500 वर्षे झाली होती. मुळाक्षरे शिकवण्याची पद्धत सर्वप्रथम इजिप्तमध्ये सुरू झाली. जगभर शिक्षणाचा प्रसार कागद, पाटीचा वापर, लेखणीची सुरुवात झाल्यानंतर मोठया प्रमाणात झाला. त्यानंतर शिक्षण या विषयात गोडी निर्माण व्हावी म्हणून भाषेचा अभ्यास विविध पद्धतींनी होऊ लागला. मराठीमध्ये ’शिकेल तो टिकेल’ ही म्हण खूपच प्रचलित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या