आभाळमाया – दुसऱया ग्रहाचा पहिला वेध…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

सोविएत युनियन अवकाशात जाण्याचा पहिला मान मिळवते तर आपण त्या पलीकडची मजल गाठली पाहिजे असं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी आणि पॅलिपहर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॅलटेक) जोमाने कामाला लागले. आधीच्या एक्स्प्लोररचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. लवकरात लवकर पृथ्वीपलीकडच्या एखाद्या ग्रहाचे जवळून निरीक्षण करणं ही गरजेची गोष्ट होती. कारण 1958 मध्ये रशियाचा युरी गागारिन हा पहिला माणूस अवकाशात गेला तेव्हा आपलं संभाव्य उद्दिष्ट जाहीर करताना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी आत्मविश्वासाने म्हटलं होतं की, आम्ही या दशकपूर्तीपूर्वी माणूस चंद्रावर पाठवू! त्याविषयी पुढच्या लेखात. तर रशियाची अवकाशी दौड सुरूच असताना 27 ऑगस्ट 1962 रोजी फ्लोरिडातील केप कार्नेवल येथून मरिनर-2 अमेरिकन यान शुक्र-ग्रहाच्या दिशेने उडालं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेल्या बुध आणि शुक्र या ग्रहांपैकी शुक्र हा आपला ‘अंतर्गह’ शेजारी, तर मंगळ ‘बाह्यग्रह’ शेजारी. सध्या इलॉन मस्कसारखे महत्त्वाकांक्षी उद्योजक स्पेस पर्यटन आणि मंगळावरच्या वस्तीची चर्चा करतात. शुक्रावर अशी वस्ती करण्याची कल्पनाही करणं का शक्य नाही ते पाहू. पृथ्वी सूर्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. बुध आणि शुक्रापासून अनुक्रमे 5 कोटी 80 लाख (बुध) आणि 10 कोटी (शुक्र) अंतरावर आहे. अर्थात बुध सूर्याच्या इतका जवळ आहे की, त्यावर पाऊल ठेवण्याची कल्पनाही कमालीची दाहक आहे. शुक्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतरही जवळपास पाच कोटी किलोमीटरचं आहे. त्यावर माणूस उतरणं शक्य नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, हा ग्रह सल्फर आणि कार्बनच्या दाट ढगांनी गवसणी घातलेला आहे. शुक्रपृष्ठावर (काल्पनिकरीत्या) उभं राहिलं तरी या मेघाच्छादित वातावरणामुळे तिथून स्वच्छ, निळं, काळं, चमचमतं आकाश दिसणारच नाही. बुधाची उष्णता, शुक्राचं ढगाळ वातावरण, मंगळावर वातावरण नसणं आणि पुढचे ग्रह तर वायुरूपच आहेत. तेव्हा पृथ्वीच्या पाठीवर उभं राहून रात्रीच्या वेळी अवघं तारांगण न्याहाळत ‘विश्वरूप’ दर्शन घडण्याचं भाग्य सूर्यमालेत केवळ त्याची जाणीव असलेल्या माणसांनाच लाभलेलं आहे. आपल्याला मिळालेला हा खजिना किती अमूल्य आहे याची जाणीव मात्र क्वचितच आढळते. बुध आणि शुक्र अंतर्ग्रह असल्याने ते आपल्या आकाशात डोक्यावर कधीच दिसत नाहीत. कधी पूर्व क्षितिजापासून थोडं वर येत त्यांचा पहाटे पूर्वोदय – पूर्वास्त होतो, तर कधी पश्चिम क्षितिजावर सायंकाळी पश्चिमोदय-पश्चिमास्त पाहायला मिळतो. बुध सूर्याच्या खूप जवळ असल्याने तो खूप अस्पष्ट दिसतो, पण शुक्र त्यावरील ढगाळ वातावरणावरून सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने खूपच तेजस्वी आणि क्षितिजापासून अगदी 47 अंश म्हणजे बराच उंच दिसतो. दुर्बिणीतून त्याची चंद्रकोरीसारखी ‘शुक्रकोर’ ही काही वेळा दिसून येते! …तर मरिनर – 2 या यानाने भरारी घेत 14 डिसेंबरला तेजस्वी शुक्राचं फक्त 35 हजार किलोमीटरवरून दर्शन घेतलं. या शुक्र परिक्रमेच्या ‘फ्लायबाय’ उपक्रमात या उपग्रहावर बसवलेले दोन रेडिओमीटर्स मायव्रह्वेव्हचं मोजमाप करत होते. त्याचवेळी इन्फ्रारेड छायाचित्रणाचा पॅमेराही कार्यरत होता. सोलार प्लाझ्मा सेन्सरद्वारे सूर्याच्या ऊर्जेतील चार्ज्ड पार्टिकल्स (भारित अणुकणांचा) अभ्यास करण्यात आला. रेडिओमेट्रिक टेम्परेचर मॅग्नॅटोमीटरने शुक्राचं तापमान नोंदलं. त्याचबरोबर सौर वाऱयांचा वेग आणि प्रभाव शुक्राजवळ किती याचाही अंदाज घेण्यात आला. 1959 मध्ये पाठवलेल्या ल्युना-1 ची निरीक्षणे जवळून निश्चित झाली. या यानाला सौर ज्वालांचंही जवळून निरीक्षण करता आलं. आता तर पार्कर सोलार यान नुकतेच सूर्यस्पर्शी झालंय, पण 1962 मध्ये मरिनर – 2 चं यश खूपच मोठं होतं. 129 दिवस शुक्र सान्निध्यात राहून त्याने 3 जानेवारी 1963 रोजी अखेरचा संदेश पाठवला.